शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज पुनर्गठित थकबाकीदार संभ्रमात!

By admin | Updated: July 8, 2017 01:49 IST

कर्जमाफीबाबत शेतकरी गोंधळात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्जमाफीच्या निर्णयानंतरही, पीक कर्ज पुनर्गठन केलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीच्या कक्षेत घेतले जात नसल्याची धक्कादायक बाब वाशिम जिल्ह्यातून समोर येत आहे. जून २०१६ पूर्वी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसल्यानंतर, राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. यानुसार ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज पुनर्गठन केलेल्या; पण ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत घेत असल्याचे निर्णयात नमूद आहे. यानुसार वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज पुनर्गठन केलेल्या; परंतु ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचा लेखाजोखा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी घेणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप या कार्यवाहीला सुरुवातच झाली नसल्याची माहिती आहे. यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुनर्गठन केलेल्या; परंतु थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मर्यादेची कर्जमाफी मिळेल की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. पुनर्गठन केलेले; परंतु थकबाकीदार असलेले शेतकरी यासंदर्भात बँकांशी संपर्क साधत आहेत. मात्र, वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना नसल्याने तूर्तास कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.सन २०१२-१३ ते २०१५-१६ या वर्षात पीक कर्जाचे पुनर्गठन केलेले; परंतु ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे. शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार थकबाकीदारांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. यासंदर्भात बँकांनादेखील योग्य त्या सूचना केल्या जातील.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था वाशिम