शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षांच्या आयुष्यवाढीसाठी फलके हटवा!

By admin | Updated: July 3, 2017 02:29 IST

दिव्यरत्न संस्थेची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर

दिव्यरत्न संस्थेची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यावसायिक जाहिरातीबाजीच्या फलकांमुळे वृक्ष सुकण्याच्या मार्गावर आहेत. ही बाब लक्षात घेऊन. बहुतांश ठिकाणी वृक्षांवर लावलेले फलक शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित हटवून वृक्षांचे विद्रुपीकरण थांबविण्यासह रस्ता रुंदीकरणाच्या पट्ट्यातील वृक्षतोड थांबवावी आणि अंमलबजावणीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिव्यरत्न प्रज्ञालंकार जनहित बहूद्देशीय संस्थेच्या वतीने शनिवार, १ जुलै रोजी देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, नैसर्गिक आरोग्यवर्धक गुणधर्म अंतर्र्भूत असलेले वृक्ष मानवाला प्राणवायू, फळे, फुले, सावलीच देत नाहीत तर अंतिम क्षणातही त्याला साथ देतात. ही जाणीव अंगी बाळगून पर्यावरणास घातक ठरणाऱ्या घटकांचे पतन करून वृक्षांचे रक्षण केले पाहिजे. सद्यस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात शासनाच्या माध्यमातून चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १ ते ७ जुलै हा सप्ताह वनमहोत्सव म्हणून राबविण्यात येत आहे. पर्जन्यमानासाठी ही बाब निश्चितच उपयुक्त असल्यामुळे ग्रामीण तथा शहरांच्या सौंदर्यातसुद्धा भर पडेल. नागरिकांनी वृक्षांना आपल्या अपत्याप्रमाणे समजून संगोपन केल्यास शुद्ध प्राणवायू मिळेल तसेच आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल; परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यावसायिक जाहिरातीबाजीच्या फलकांमुळे सजीव वृक्षांचे आयुष्य घटत चालले आहे. त्याकरीता बहुतांश ठिकाणी वृक्षांवर लादलेले फलक शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित हटविण्यासह वृक्षांचे विद्रुपीकरण थांबवावे, रस्ता रुंदीकरणाच्या पट्ट्यातील वृक्षतोड थांबवावी आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवळी दिव्यरत्न प्रज्ञालंकार जनहित बहूद्देशीय संस्थेच्या हंसिनी उचित, ममता खाडे, अनिता पंडित, संगीता पिंजरकर, मनीषा दाभाडे यांच्यासह शशीभूषण खडसे, सुनील दिवटे, सतीश पारणकर, अभिजित लोखंडे, संदेश बांडे, एन.पी. सरकटे, सुनील कांबळे, प्रेमचंद कांबळे, अ‍ॅड. विजय बन्सोड आदींची उपस्थिती होती.