शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रेमेडीसिवर इंजेक्शनचा वापरही वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:48 IST

जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली. ...

जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली. नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात कोरोनाचा आलेख खाली आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची घटली होती. दरम्यान, गत १० दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. जवळपास ८ ते १० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून येत असल्याने त्यांना सरकारी तसेच खासगी कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात येते. जानेवारी महिन्याच्या तुलनेत अलिकडच्या काळात रेमेडीसिवर इंजेक्शनचा वापर काही प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. ऑक्सिजनची गरज असलेले १५ रुग्ण आहेत. कोरोनाचा कहर सुरू असल्याने रेमेडीसिवर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, मुबलक प्रमाणात रेमेडीसिवर इंजेक्शन व अन्य औषधी साठाही उपलब्ध करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. जिल्ह्यात सध्या जवळपास ५०० रेमेडीसिवर इंजेक्शन उपलब्ध आहेत.

०००

सौम्य लक्षणे असणारे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये तीव्र लक्षणे असणारे रुग्ण उपचारार्थ आहेत. रेमडेसिवर इंजेक्शनसह आवश्यक त्या औषधाचा साठा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

- डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय

००

मुबलक प्रमाणात औषध उपलब्ध

गत १० दिवसांपासून कोरोनाचा आलेख प्रचंड झेपावत असल्याचे दिसून येते. खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आरोग्य यंत्रणेला दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अ‍ॅन्टिजेन टेस्ट, अन्य औषध साठाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.