शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करा!

By admin | Updated: July 10, 2017 02:03 IST

शिवसेना आक्रमक : याद्या प्रसिद्ध न झाल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड: कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी दर्शनी भागात लावण्याच्या मागणीसाठी शिवसेना तालुका शाखा आक्रमक झाली आहे. सदर याद्या न लावल्यास १० जुलै रोजी बँकांसमोर आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख महादेव ठाकरे यांनी शनिवारच्या बैठकीत दिला.शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूळकर, खासदार भावना गवळी, जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रिसोड येथे शिवसेनेची बैठक पार पडली. यावेळी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी बँकांनी जाहीर करावी, तसेच बँकेसमोर लावावी, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य न झाल्यास विविध टप्प्यात आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांचा आकडा जाहीर केला असून, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे, त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत किती कर्ज माफ झाले, याची माहिती नाही. जोपर्यंत कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची अधिकृत यादी संबंधित बँक प्रसिद्ध करीत नाही तोपर्यंत शेतकरी कर्ज माफीमध्ये बसला किंवा नाही, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणार नाही. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले त्या बँकांनी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी फलकावर लावावी, या शेतकरी हिताच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक असल्याचे ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. बँकांना ही माहिती देण्यास भाग पाडले जाणार आहे. केनवड येथे सकाळी १० वाजता, मांगुळझनक येथे सकाळी ११ वाजता, केशवनगर येथे सकाळी ११.३० वाजता, रिठद येथे दुपारी १२.३० वाजता, चिखली येथे १.३० वाजता, रिसोड येथे २ वाजता, वाकद येथे ३ वाजता, मोप येथे ३.३० वाजता अशा विविध ठिकाणी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी फलकावर लावण्याची मागणी केली जाईल.