गोरगरीब रुग्णांना मोफत व अत्यल्प दरात उपचार मिळावे याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. अपघातग्रस्त तसेच जोखीम गटातील रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी व्हिलचेअर किंवा स्ट्रेचरची सुविधा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध आहे. जवळपास २५ स्ट्रेचर असून, गंभीर रुग्णाला रुग्णालयात नेताना काहीवेळा कर्मचाऱ्यांऐवजी नातेवाईकांचाच आधार मिळतो तर काहीवेळेला कर्मचारी ‘स्ट्रेचर’ची सेवा देतो.
००
जिल्हा सामान्य रुग्णालयात स्ट्रेचरची सुविधा उपलब्ध आहे. रुग्णाला स्ट्रेचरवरून नेताना कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभते तर कधी-कधी नातेवाईकांनाच स्ट्रेचरवरून रुग्णाला न्यावे लागते.
- शिवराम कांबळे, नातेवाईक
००
जिल्हा सामान्य रुग्णालयात शक्यतोवर कर्मचाऱ्यांनीच रुग्णाला स्ट्रेचरवरून नेणे अपेक्षित आहे. काहीवेळेला हे शक्य होत नसल्याने स्ट्रेचर उपलब्ध होताच नातेवाईक हे रुग्णाला स्ट्रेचरवरून नेतात. - योगेश उबाळे
००
जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात पुरेशा संख्येत व्हिलचेअर व स्ट्रेचर उपलब्ध आहेत. अपघातग्रस्त रुग्ण किंवा जोखीम गटातील रुग्णाला कर्मचारी हेच व्हिलचेअर व स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेतात. एखाद्या वेळी संबंधित रुग्णाचे नातेवाइकदेखील रुग्णाला स्ट्रेचरवरून नेताना कर्मचाऱ्यांना मदत करतात.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
००
रुग्णालयात रोजचा
ओपीडी ५००
००
जिल्हा रुग्णालयात उपलब्ध स्ट्रेचर २५