शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कारंजातून आमदारकीसाठी महसूल राज्यमंत्र्यांनीही दर्शविली तयारी!

By admin | Updated: July 3, 2017 02:32 IST

नवख्यांना अप्रत्यक्ष इशारा : कारंजात झाली पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा-मानोरा मतदारसंघात शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या जरी मोठ्या प्रमाणात असली, तरी ऐनवेळी चुरस निर्माण झाली, तर मी शिवसेनेचा उमेदवार राहू शकतो, असे म्हणत विद्यमान महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी कारंजातून आमदारकीसाठी तयारी दर्शविली आहे. यायोगे त्यांनी नव्यानेच शिवसेनेत प्रवेश घेतलेल्यांना एकप्रकारे इशारा दिल्याने इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत.शिवसेनेच्यावतीने रविवार, २ जुलै रोजी कारंजात रोगनिदान शिबिर व मोफत औषध वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तद्नंतर आयोजित पत्रकार परिषदेत महसूल राज्यमंत्र्यांनी वरील विधान केले. कारंजा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचे बळकटीकरण होईल का, या प्रश्नावर संजय राठोड म्हणाले, की प्रकाश डहाके यांनी शिवसेनेत अद्याप अधिकृत प्रवेश घेतलेला नाही. तसेच याबाबत मलादेखील कुठलीच ठोस माहिती नसल्याचे ते म्हणाले. आगामी कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता शिवसेनेकडे उमेदवारी मागण्यासाठी डॉ. श्याम जाधव, डॉ.सुभाष राठोड, डॉ.महेश चव्हाण यांची सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून चढाओढ सुरू आहे. तसेच इतर पक्षांमधील अनेक दिग्गज नेते देखील शिवसेनेत प्रवेश घेण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चितपणे कुणाला मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला असता, ना. संजय राठोड म्हणाले, की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा माझ्यावर पूर्णत: विश्वास आहे. त्यामुळे जर कारंजा मतदारसंघात उमेदवारांमध्ये जास्तच चढाओढ झाली, तर पक्ष मला देखील उमेदवारी देऊन निवडणूक लढण्याचा आदेश देऊ शकते. त्यासाठी आपण तयार आहोत, असे संजय राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला डॉ.श्याम जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील, डॉ.सुभाष राठोड, दिनेश राठोड, नरहरी कडू, गणेश बाबरे, विवेक नाकाडे आदींची उपस्थिती होती.