शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

स्वस्त धान्य दुकानांतील गहू वितरणात कपात!

By admin | Updated: May 3, 2017 01:52 IST

तांदळाचा साठा वाढल्याचा परिणाम : अंत्योदय व केशरी शिधापत्रिकाधारकांची होणार गैरसोय

वाशिम : पुरवठा विभागाकडील तांदळाचा साठा अचानक वाढल्याने स्वस्त धान्य दुकानांमधून होणाऱ्या गहू वितरणात कपात करून त्याऐवजी लाभार्थींना तांदूळ दिला जात आहे. त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील अंत्योदय व केशरी शिधापत्रिकाधारकांना बसला असून, त्यांना आपली गरज भागविण्याकरिता खुल्या बाजारातून अधिक दराने गहू विकत घ्यावा लागत आहे.जिल्ह्यातील २ लाख ८९ हजार शिधापत्रिकाधारक कुटुंबांपैकी जवळपास दीड लाख कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानांमधून गहू, तांदूळ आणि साखरसह आवश्यक वेळी इतर धान्य आणि तेलाचा रास्त दराने पुरवठा केला जातो. शहरी भागात ५९ हजार; तर ग्रामीण भागात ४० हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या किंवा शेतमजूर केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. संबंधितांना महिन्याला मानसी ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचे वितरण केले जाते; परंतु दोन महिन्यांपासून या प्रमाणात बदल करून संबंधित कुटुंबांना मानसी २ किलो गहू आणि ३ किलो तांदळाचे वितरण करण्यात येत आहे; तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थींसाठी प्रति कुटूंब २० किलो गहू आणि १५ किलो तांदळाचे वितरण केले जात होते. त्यातही बदल करून आता संबंधित कुटुंबांना १९ किलो गहू आणि १६ किलो तांदूळ, या प्रमाणात वितरण सुरू करण्यात आले आहे. पुरवठा विभागाकडे तांदळाचा साठा अधिक झाला असल्याने वितरणाच्या प्रमाणात हा बदल करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात रोजच्या जेवणासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख घटकांत किं वा धान्यांत गहू आवश्यक असतो. भात हा पदार्थ चवीसाठी अथवा आवडीनुसार जेवनात ठेवला जातो. त्यामुळे आता तांदळाचे प्रमाण वाढवून गहू वितरण कमी झाल्याने महिन्यातील पंधरा दिवस स्वस्त धान्यावर पोट भरणाऱ्या कुटुंबांना बाजारातून गहू विकत घ्यावा लागत आहे. स्वस्त धान्य दुकानांत २ रुपये किलोने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदळाचे वितरण होते. त्यामुळे फारशी गरज नसलेल्या धान्यावर नाहक खर्च करावा लागत आहेच. शिवाय आवश्यक धान्याचे प्रमाण कमी झाल्याने शिधापत्रिकाधारक कुटुंबाला जवळपास १० पट अधिक भाव असलेला गहू विकत घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे.स्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्नवाशिम जिल्ह्यात साधारणत: भात खाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शिधापत्रिकांवर तांदळाचे वितरण वाढविल्याने अनेक कुटुंबांना अडचणी जाणवत असल्याचे पुरवठा विभागाच्याही लक्षात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन लाभार्थींच्या सोयीसाठी तांदूळ वितरणाचे प्रमाण कमी करून गव्हाचे प्रमाण वाढविण्यासाठी तहसील स्तरावरून जनतेच्या मागणीनुसार अहवाल मागविण्याचा विचार जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर गव्हाचे वितरण वाढविण्यासाठी शासनाकडे सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गहू वितरणाचे प्रमाण पूर्ववत झाले, तर जिल्ह्यातील एक लाख केशरी आणि ६२ हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक मिळून दीड लाखांहून अधिक लाभार्थी कुटुंबांना जाणवणारी मोठी समस्या सुटण्यास मदत मिळणार आहे. जिल्ह्यात केशरी किं वा प्राधान्य असलेल्या शिधापत्रिकांवरील गहू वितरणाचे मानसी प्रमाण एक किलोने कमी करून तांदूळ वितरणाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. तांदळाचा साठा वाढल्याने हा निर्णय तात्पुरत्या काळासाठी घेतला आहे. हा निर्णय इतरही जिल्ह्यात आहे. तथापि, जनतेच्या सोयीसाठी गव्हाचा पुरवठा वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची बाब विचाराधिन आहे. - अनिल खंडागळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम