शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये हळद खरेदी प्रक्रिया पूर्ववत

By admin | Updated: July 16, 2017 02:13 IST

८३00 रुपये प्रतिक्विंटलचा दर; पहिल्या दिवशी ५00 क्विंटलची आवक.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या हळद खरेदी प्रक्रियेस स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार, १५ जुलैपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ५00 क्विंटल हळदीची आवक झाली. त्यास ८३00 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. वाशिम बाजार समितीने नेमलेल्या दिवशी म्हणजेच शनिवारी हळद उत्पादक शेतकरी मोठय़ा प्रमाणात आपला माल विक्रीसाठी आणत होते. मात्र, १ जुलैपासून हळद खरेदी बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरू व्हावी, यासाठी शेतकर्‍यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल, अशी भूमिका शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माणिक देशमुख, तालुका प्रमुख रामदास मते पाटील, शहर प्रमुख गजानन भादुंर्गे, उपशहर प्रमुख दिलीप काष्टे यांनी घेतली होती. दरम्यान, शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीचे विद्यमान संचालक राजू चौधरी, सुरेश मापारी, हिराभाई जानीवाले, विनोद पट्टेबहादूर, बापूराव उगले, आनंद चरखा यांनी अडते, व्यापारी, हमाल यांच्यासोबत चर्चा करून हळद खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी यशस्वी पुढाकार घेतला. त्यामुळे १५ जुलैपासून हळद खरेदी पुन्हा सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी ८३00 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.हळद उत्पादकांनी व कास्तकारांनी हळद विक्रीसाठी दर शनिवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावी. आजच्या खरेदीत ७00 क्विंटल आवक झाली असून, ७५00 ते ८३00 रुपये क्विंटल प्रमाणे त्यांना भाव मिळाला आहे.- बबनराव इंगळेसचिव, कृउबास, वाशिम