शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक

By admin | Updated: April 26, 2017 01:28 IST

वाशिम: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होत असून, या वाणाच्या मोजणीसाठी वेळ मिळावा म्हणून सोमवारी इतर वाणांची मोजणी थांबविण्यात आली होती.

वाशिम: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होत असून, या वाणाच्या मोजणीसाठी वेळ मिळावा म्हणून सोमवारी इतर वाणांची मोजणी थांबविण्यात आली होती. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळद लागवड होत असतानाही या वाणाला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना हळद विक्रीसाठी इतर जिल्ह्यात न्यावी लागत होती. परिणामी, शेतकऱ्यांना वाहतूकीचा भुर्दंड सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने मागील दोन वर्षांपासून हळद खरेदीला सुरुवात केली. आठवड्यात फक्त शनिवारी हळद खरेदी केल्या जातो. यामुळे शनिवारपासून जिल्हाभरातून तब्बल ४ हजार क्किंटल हळद बाजार समितीत आली होती. त्यानंतर तीन दिवसांपासून हळदीचा काटा केल्या जात असल्याने सोमवार २४ एप्रिल रोजी इतर मालाची खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळद विक्रीसाठी बाजारपेठ असावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन वर्षांपासून हळद खरेदीला सुरुवात केली. त्यासाठी आठवड्यातील शनिवार दिवस निश्चित करण्यात आला आहे. यंदा जिल्ह्यात हळदीचे उत्पादन चांगले झाल्याने बाजारात आवक वाढली. शनिवार २२ एप्रिल रोजी आलेल्या मालाची मोजणी करण्यासाठी २३ एप्रिल रोजी रविवार असतानाही मोजणी केल्या गेली. त्यानंतरही हळदीची मोजणी होऊ शकली नसल्याने मोजणीसाठी इतर वाणाची खरेदी थांबविण्यात आली, ४ हजार क्विंटल हळद खरेदी लक्षात घेत व्यापाऱ्यांनी सोमवारी इतर शेतमालाची खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शनिवार, रविवार व सोमवार सतत तिन दिवस खरेदी केलेल्या हळदीची मोजणी केल्या जात असून बाजार समितीत हळदीला प्रति क्किंटल ५८०० एवढा दर देण्यात आला. त्यामुळे जिल्हाभरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.