सिंचनाचा अनुशेष, शेतकरी व गावकऱ्यांवर घोंगवणारे जलसंकट पाहता घोटा-शिवणी, बोरव्हा, सत्तरसावंगी या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. तसेच अडाण नदीवर या भागाची भौगलिकता पाहता जलसंधारण हेतूने इतर उपचार होऊ शकत नाहीत. प्रस्तावानुसार या प्रकल्पातून ३ हजार ६३९ हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीत सिंचन होऊ शकते. १७ पूर्णांक ७८४ दलघमी पाणीसाठा होणार आहे. १९ मार्च २०१९ च्या राज्यपाल यांच्या पत्रानुसार, राज्य शासनाचे ९ मार्च २०२० च्या पत्रानुसार वाशिम जिल्ह्यातील अनुशेष अंतर्गत योजनांचा कृती आराखडा तसेच निधी उपलब्धतेचे नियोजन सादर केल्याशिवाय निधी खर्च करता येणार नसल्याची अट टाकली आहे. वाशिम जिल्ह्यात असे प्रलंबित किंवा अपूर्ण ४८ प्रकल्प आहेत. त्यामुळे इतरांचे खापर संबंधित गावावर फोडू नये. म्हणून तत्काळ नव्याने प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे कुळकर्णी यांनी केली. यावेळी ज्येष्ठ नेते संजय देशमुख हे हजर होते. ००००००००००००००००००० बॅरेजेसमधून अपेक्षित सिंचन पाणीसाठा.
बॅरेज - सिंचन क्षेत्र - जलसाठा
१) घोटा-शिवणी - १३९४ हे. - ७.०६२ दलघमी
२) बोरव्हा - ९०० हे. - ४. ३५० दलघमी
३) सत्तरसावंगी - १३४५ हे. - ६ . ३७२ दलघमी