विद्यालयात दहावीतून अमृता सुखदेव बाजडने प्रथम, गायत्री सुरेश बाजडने द्वितीय, तर सुजाता महादेव बावदनकरने तृतीय क्रमांक पटकावला. बारावीमध्ये निकीता ज्ञानबा बाजडने प्रथम, महेश गजानन बाजडने द्वितीय, तर अनिता गजानन बाजडने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच वर्ग दहावी व बारावीमधून प्रत्येक विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना विषय शिक्षकांकडून प्रोत्साहनपर बक्षीस देऊन विषय शिक्षकांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. सिक्कीम येथे भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटमधील पवन प्रकाश शिंदे (वय ३६) या माजी विद्यार्थ्याचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अर्जुनराव बाजड, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुरुषोत्तम पाटील-बाजड, जिल्हा नियोजन समिती सदस्य महादेवराव ठाकरे, संस्थेचे सचिव विठ्ठलराव बाजड, रामेश्वर बाजड, ॲड. प्रल्हाद बाजड, प्राचार्य विनोद नरवाडे, सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विनोद मेटांगळे, तर आभार प्रदर्शन विष्णू वाघ यांनी मानले.
रिसोड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST