शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, तुरीच्या बियाण्यांकडे शेतकºयांची पाठ 

By admin | Updated: June 12, 2017 13:39 IST

शेतकºयांनी सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांकडे पाठ फिरविली असून, या दोन्ही वाणांसाठी घरचे बियाणे वापरण्यावर अधिक भर असल्याचे दिसत आहे.

घरच्या बियाण्यांवर भर: मुग, उडिदाची मागणी वाढलीवाशिम: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांकडे पाठ फिरविली असून, या दोन्ही वाणांसाठी घरचे बियाणे वापरण्यावर अधिक भर असल्याचे दिसत आहे. मुग आणि उडिदाच्या बियाण्यांची मागणी वाढल्याची माहिती कृषी सेवा केंद्रांकडून प्राप्त होत आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ४ लाख २ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र २ लाख ८७ हजार ४३० हेक्टर, तुरीचे ६३ हजार ५०१ हेक्टर, मुगाचे १२ हजार ६०० हेक्टर, तर उडिदाचे १५ हजार २१७ हेक्टर होते. यंदाही तूर आणि सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होणार असला तरी, त्याचे क्षेत्र घटणार असल्याचे बाजारातील स्थिती आणि कृषी विभागाच्या प्रस्तावित अहवालावरून स्पष्ट होते. मागील वर्षी सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले; परंतु या दोन्ही वाणांना अपेक्षेपेक्षा खूप कमी भाव मिळाल्याने हजारो शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंतही या वाणांची विक्री केली नाही. त्यामुळे या पिकांचे क्षेत्र कमी करून इतर पिकांचे क्षेत्र वाढविण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. त्यातच घरीच मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि तूर पडून असल्याने या वाणाचे बियाणे विकत घेण्यापेक्षा घरचे बियाणे वापरण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. कृषी सेवांकेंद्रांकडून घेतलेल्या माहितीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांची मागणी ५० टक्क्यांनी घटल्याचे सद्यस्थितीत स्पष्ट होत आहे. दरम्यान मागील वर्षीपेक्षा यंदा बियाण्यांचे दर कमी झाल्याचे या संदर्भातील माहितीवरून स्पष्ट होत आहे.