शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

रेशन दुकानांची चौकशी होणार!

By admin | Updated: August 15, 2016 02:27 IST

दुकानांमधून दरपत्रक गायब असल्याचे प्रकरण लोकमत स्टिंग ऑपरेशनमधून आले होते उघडकीस; पुरवठा विभागाद्वारे आता जिल्हाभरात तपासणी मोहीम.

संतोष वानखडे वाशिम, दि. १४: जिल्ह्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानांतून दरपत्रक व माहितीदर्शक फलक गायब झाल्याचे स्टिंग लोकमतने प्रकाशित करताच पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली. स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दिले. फलक नसणार्‍या दुकानांचा अहवाल मागविला असून, दोषी आढळणार्‍यांवर कडक कारवाईचे संकेत पुरवठा विभागाने दिले.सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. गोरगरिबांना वितरित होणार्‍या रेशन धान्याचा पुरवठा पात्र लाभार्थींपर्यंत योग्य किमतीत व योग्य प्रमाणात व्हावा म्हणून रेशन दुकानात भावफलक, उपलब्ध साठा, तक्रार वही ठेवणे बंधनकारक आहे. शासनाच्या या नियमांचा ह्यअर्थह्ण संबंधितांनी स्वत:ला ह्यअर्थह्ण आणण्याच्या कामी लावल्याने या योजनेतील पारदर्शकता हरवत चालली आहे.रेशन दुकानात लोकांना स्पष्टपणे वाचता येईल, असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन, रेशनकार्ड संख्या, भाव व देय प्रमाण, उपलब्ध कोटा, रेशनवर घेतलेल्या धान्याची पावती देणे अनिवार्य असतानाही, वाशिम जिल्ह्यात काही दुकानांमध्ये या नियमाला मूठमाती दिली जात असल्याचे प्रकार सुरू आहे. यासंदर्भात ह्यलोकमतह्ण चमूने ११ ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात स्टिंग ऑपरेशन राबविले. मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरातील काही दुकाने बंद आढळून आली, तर काही दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे दरपत्रक आढळून आले नाही. एक दुकान तर पडक्या घरात थाटले असल्याचे दिसून आले. शिरपूर परिसरातील काही गावांमध्ये असेच चित्र दिसून आले.