शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानांची होणार चौकशी

By admin | Updated: August 14, 2016 16:47 IST

वाशिम जिल्ह्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानांतून दरपत्रक व माहितीदर्शक फलक गायब झाल्याचे ‘स्टिंग’ लोकमतने प्रकाशित करताच पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली.

संतोष वानखडे
वाशिम - जिल्ह्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानांतून दरपत्रक व माहितीदर्शक फलक गायब झाल्याचे ‘स्टिंग’ लोकमतने प्रकाशित करताच पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली. स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकार्‍याने दिले. फलक नसणाºया दुकानांचा अहवाल मागविला असून, दोषी आढळणाºयांवर कडक कारवाईचे संकेत पुरवठा विभागाने दिले.
सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. गोरगरीबांना वितरित होणाºया रेशन धान्याचा पुरवठा पात्र लाभार्थींपर्यंत योग्य किंमतीत व योग्य प्रमाणात व्हावा म्हणून रेशन दुकानात भावफलक, उपलब्ध साठा, तक्रार वहि ठेवणे बंधनकारक आहे. वाशिम जिल्ह्यात काही दुकानांमध्ये या नियमाला मूठमाती दिली जात असल्याचे प्रकार सुरू आहे. यासंदर्भात  ‘लोकमत’ चमूने ११ आॅगस्ट रोजी  ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात स्टिंग आॅपरेशन राबविले. मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरातील काही दुकाने बंद आढळून आली तर काही दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे दरपत्रक आढळून आले नाही. एक दुकान तर पडक्या घरात थाटल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील रिसोड, वाशिम, कारंजा, मानोरा व मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामीण भागातही काही दुकानांच्या दर्शनी भागात दरपत्रक, तक्रार पेटी आढळून आली नव्हती तसेच पावती दिली जात नसल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. यासंदर्भात १२ आॅगस्टच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित होताच, पुरवठा विभाग आणि नियमांची पायमल्ली करणाºया स्वस्त धान्य दुकानदारांत एकच खळबळ उडाली. या स्टिंग आॅपरेशनची दखल घेत जिल्हा पुरवठा विभागाने दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश पुरवठा निरीक्षकांना दिले. 
रेशन दुकानांच्या दर्शनी भागात दरपत्रक व माहितीदर्शक फलक न लावणे ही गंभीर बाब असून, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे यांनी दिला. फलक न लावणाºया दुकानांचा अहवाल मागविला जाणार असून, चौकशीअंती दोषी आढळणाºयांना कारवाई करण्याचे संकेत पुरवठा विभागाने दिले.