शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात बायोमेट्रिक वितरण प्रणालीस रेशन दुकानदारांचा ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:50 IST

वाशिम: शासनाच्या निर्देशानुसार यंदापासून बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वितरण प्रणालीस सुरुवात करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ७७४ स्वस्तधान्य दुकानांत बायोमेट्रिक अर्थात पॉस मशीनचे वितरण मार्च महिन्यातच करण्यात आले; परंतु अद्यापही ६० टक्के दुकानांत त्याचा वापर होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पारदर्शक रेशन वितरण प्रणालीस खो मिळाला आहे. 

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील वास्तव६० टक्के दुकानांत मशीनचा वापरच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या निर्देशानुसार यंदापासून बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वितरण प्रणालीस सुरुवात करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ७७४ स्वस्तधान्य दुकानांत बायोमेट्रिक अर्थात पॉस मशीनचे वितरण मार्च महिन्यातच करण्यात आले; परंतु अद्यापही ६० टक्के दुकानांत त्याचा वापर होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पारदर्शक रेशन वितरण प्रणालीस खो मिळाला आहे. शासनाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना बायोमेट्रिक रेशन प्रणालींतर्गत पॉस मशीनचे वाटप करुन मशीन संदर्भात प्रशिक्षण देऊन संबंधित तहसील कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत एकूण ७७४ पॉस मशिनचे वाटप करण्यात आले आहे. काही दुकानदारांना या मशिनच्या वापराचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या प्रणाली नुसार स्वस्तधान्य कार्डधारकांना धान्याचे वाटप होणे अपेक्षीत होते. मशीनमध्ये अंगठ्याचा ठसा लावल्यानंतर ज्या कुटूंबातील शिधापत्रिका धारकाचे आधारकार्ड आॅनलाईन नोंदणी असेल तेवढयाच लोकांचे धान्य मिळते. यासाठी कुटुंबातील सदस्य धान्य घेताना आवश्यक आहे. स्वस्त धान्य विभागातील काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. या मशीनला अंगठ्याचा ठसा दिल्यानंतरच या कार्डधारकाला धान्य मिळते; परंतु या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी ७७४ दुकानदारांना पॉस मशीनचे वाटप करूनही ६० टक्के दुकांनात त्याचा वापर होत नसल्याचे वास्तव आहे.