शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कुंभी-धानोरा मार्गाच्या दुरुस्तीसाठी रास्तारोकोचा इशारा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 19:50 IST

मंगरुळपीर सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत करण्यात आलेल्या कुंभी ते धानोरा रस्त्याची अल्पावधीतच दैना झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांना जीवघेणी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे.

ठळक मुद्देकुंभी-धानोरा रस्त्याची दैनावाहनधारकांना करावी लागते जीवघेणी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव पो स्टे (वाशिम):  मंगरुळपीर सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत करण्यात आलेल्या कुंभी ते धानोरा रस्त्याची अल्पावधीतच दैना झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांना जीवघेणी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. या प्रकारामुळे मोठा अपघात घडून जिवित हानी होण्याची शक्यता असल्याने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील जनतेने केली असून, त्याची दखल न घेतल्यास ३० नोव्हेंबर रोजी धानोरा परिसरातील शिवणी दलेलपुर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.मंगरुळपीर तालुक्यातील कुंभी ते धानोरा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण गेल्या  दोन ते  तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत करण्यात आले; परंतु अल्पावधीतच या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. अशात खड्डे वाचवून समोरच्या वाहनाला मार्ग देण्यासाठी चालकांना मोठी कसरत करावी लागते. या प्रयत्नात एखादवेळी मोठा अपघात घडून जिवित हानी होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. दरम्यान, सद्यस्थितीत मंगरुळपीर ते धानोरा मार्गाची दुरुस्ती करण्यात येत असून,  सार्वजनिक बांधकाम विभागाने कुंभी ते धानोरा रस्त्याची अवस्थाही लक्षात घ्यावी आणि अपघाताचा धोका टाळण्यासाठी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी   विष्णू फड, शाकिर मो जहिर, संदीप ठाकरे, उत्तम कुटे, अशफाक डॉक्टर, जाबिर शेख, आलिम सत्तार, राजमंगल भेंडेकर, बाजीराव भेंडेकर, गणेश भेंडेकर, गणेश कोकरे, स्वानंद भेंडेकर, योगेश भेंडेकर, सुधाकर भेंडेकर,अमर भेंडेकर, रामेश्वर ठाकरे, सचिन ठाकरे, आशीष खडसे, संतोष भालेकर यांच्यासह कुंभी, नांदगाव, शिवणी आणि आसेगावसह परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याची दखल न घेतल्यास येत्या ३० नोव्हेंबर रोजी शिवणी दलेलपूर फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  

खड्ड्यांमुळे रुग्णांच्या जिवाला धोकाकुंभी ते धानोरा रस्त्यावर पडलेले खड्डे वाचविताना वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहेच; परंतु गंभीर आजारी असलेल्या किंवा अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्ती किंवा गरोदर महिलेस वाहनांतून आरोग्य उपकें द्र वा खाजगी दवाखान्यात नेतेवेळी चालकांना मोठी काळजी घेत वाहन चालवावे लागते. अशात रस्त्यावरील खड्डे मोठा अडथळा ठरून रुग्णाला दवाखान्यात पोहोचविण्यासाठी विलंब लागू शकतो. त्यामुळे संबंधित रुग्ण किंवा अपघातातील जखमी व्यक्तीचा जीवही धोक्यात येण्याची भिती आहे. या गंभीर बाबीची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी, अशी मागणीही परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा