याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गवळीपुरा भागातील एका २६ वर्षीय विवाहित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी आरिफ जंगली बेनिवाले (२७) हा माझ्या घराशेजारी वास्तव्याला आहे. शिक्षणासाठी तो बाहेरगावी राहत होता; मात्र मार्च २०२० मध्ये तो परत घरी आला. त्यानंतर आमची ओळख झाली. तुझा नवरा दारू पितो, तू खूप सुंदर आहे, मी तुझ्याशी लग्न करतो व तुझ्या दोन्ही मुलांचा सांभाळही करणार, अशी बतावणी करून त्याने २९ जून २०२० रोजी त्याने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी नमूद आरोपीवर भादंविचे कलम ३७६ (२), एन नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय मंजूषा मोरे करीत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST