अनसिंग (जि. वाशिम) : घरासमोरील सांडपाणी सोडल्यावरून भांडणे होऊन काठीने मारहाण केल्याप्रकरणी एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना एकांबा येथे २२ जुलैला ५ वाजता घडली. अनसिंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या एकांबा येथील फिर्यादी विठ्ठल भीमराव चव्हाण (२२) यांनी फिर्याद दिली की, आरोपी प्रल्हाद काशीराम राठोड (रा. एकांबा) यांनी घरासमोरील सांडपाण्याच्या वादातून भांडणे करून फिर्यादीला काठीने हाता-पायावर वार करून गंभीर जखमी केले. यावरून बिट जमादार देविदास पत्रे यांनी आरोपीवर भादंविच्या कलम ३२४, ५0४, ५0६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
क्षुल्लक कारणावरून मारहाण
By admin | Updated: July 24, 2015 01:21 IST