शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणरायांची सुरक्षा रामभरोसे!

By admin | Updated: September 1, 2014 00:43 IST

लोकमत स्टींग ऑपरेशन ; अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुढाकाराची गरज.

वाशिम : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला धुमधडाक्यात प्रारंभ झाला, तर दुसरीकडे गणरायांच्या मूर्तीची सुरक्षितता जपण्याबाबत पोलिस यंत्रणा थोडी गाफीलच असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले आहे. ३0 ऑगस्टच्या रात्री १0 ते १ वाजेदरम्यान लोकमत चमूने, वाशिम शहरातील गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या विविध ठिकाणच्या मंडपांच्या पाहणीतून हा प्रकार समोर आला.वाशिम शहरात ५२ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला जात असल्याचा दावा पोलिस प्रशासन करीत असते. वाशिम शहरातील गणरायांच्या मूर्ती रात्रीच्या सुमारास किती सुरक्षित आहेत, रात्रीची पोलिस गस्त व पोलिस बंदोबस्त तसेच स्वयंसेवकांची निगराणी कशी आहे, याची पडताळणी करण्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या शहरातील विविध भागाच्या मंडपांची पाहणी करण्यात आली. शहरातील पाटणी चौक, रिसोड नाका, लाखाळा परिसर, अकोला नाका, बसस्थानक परिसर, सुभाष चौक, नगर परिषद चौक, गणेश पेठ आदी भागातील मंडपांची प्रकर्षाने पाहणी केली. यावेळी काही मंडपांच्या आसपासही कुणीच नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले. अनेक मंडपाच्या आतमध्येही कुणीच नसल्याचे जाणवले. गणरायांच्या काही मूर्ती रामभरोसे असल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले. सुरक्षा व्यवस्था गाफील असल्याचा लाभ उठवत कुणाकडून मूर्तीबाबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कुणी माथेफिरूने मूर्तीची विटंबना केली, तर याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या पृष्ठभूमीवर गणरायांच्या मूर्तीची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणेने पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे.दरम्यान गणेश उत्सव साजरा करण्यासाठी शहरामधील गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी आमच्याकडे रितसर परवानगी मागितली आहे. गणेश मंडळांना परवानगी देते वेळेस आम्ही त्यांना गणेश मूर्तीच्या सुरक्षिततेबाबत सूचना दिलेल्या आहेत. गणेश मूर्तीची सुरक्षा करणे हे त्या-त्या मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य यांची जबाबदारी असते. याव्यतिरिक्त शहरामध्ये प्रमुख ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट तैनात केले आहेत. यासोबतच रात्रीच्या वेळी पोलिस अधिकार्‍यांची गस्त शहरामध्ये सुरू असते, असे ठाणेदार संग्राम सांगळे यांनी सांगीतले. *५२ गणेश मंडळेवाशिम शहरात एकूण ५२ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. यापैकी काही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे, तर काही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अजूनही तत्त्परतेने कार्यान्वित झाली नसल्याची परिस्थिती आहे. संभाव्य अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सुरक्षितता असणे गरजेचे आहे.*कुठेही आढळले नाही पोलिसवाशिम शहरात ङ्म्री गणेशोत्सवानिमित्त शहरात अतिशय कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचा अनुभव सकाळी नागरिकांना चौका-चौकातील पोलिसांवरून आला; मात्र रात्रीच्यावेळी लोकमतने स्टिंग केले त्यावेळी कोठेही पोलिस आढळले नाही.**असे केले स्टिंग ऑपरेशनवाशिम शहरातील स्थापन करण्यात आलेल्या ङ्म्री गणेशोत्सव मंडळातर्फे ङ्म्रींच्या सुरक्षिततेबाबत लोकमत टिमने रात्री ११.३0 वाजता स्टिंगला सुरुवात करण्यात आली. या स्टिंगमध्ये शहरातील ६ गणेश मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या ङ्म्रींच्या सुरक्षिततेचा अभाव आढळून आला, तर दोन गणेशोत्सव मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या ङ्म्री गणेशाच्या सुरक्षिततेबाबत कमतरता आढळून आली. लाखाळा परिसरातील ४, रिसोड नाका परिसरातील शिक्षक कॉलनीदरम्यान एक व जुन्या जिल्हा परिषद रस्त्यावरील असे एकूण ६ गणेश मंडळातर्फे ङ्म्रींची स्थापना करण्यात आली. सुरक्षिततेबाबत कोणतीच काळजी घेण्यात आली नाही. रात्रीच्या वेळी केवळ मंडपाचा पडदा झाकून होता. आतमध्ये कोणीही दिसून आले नाही.