शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पशु-पक्ष्यांना दररोज अन्नदान करणारा राम

By admin | Updated: January 9, 2017 15:36 IST

नंदकिशोर नारे वाशिम, दि. 9 - पशु-पक्ष्यांविषयी प्रेम असल्याने दिनचर्या म्हणून पोलीस खात्यातील राम नामक कर्मचारी दररोज अन्नदान करुन त्यांची ...

नंदकिशोर नारे

वाशिम, दि. 9 - पशु-पक्ष्यांविषयी प्रेम असल्याने दिनचर्या म्हणून पोलीस खात्यातील राम नामक कर्मचारी दररोज अन्नदान करुन त्यांची भूक व तहान भागविण्याचे कार्यकरित आहे. गत दोन वर्षांपासून ते हे कार्य अविरतपणे राबवित आहेत. विशेष म्हणजे पक्ष्यांना सुध्दा त्यांची चाहुल लागताचं त्यांच्या बाजुला घिरटया घालतांना अनेकांनी पाहीले आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील रहिवासी तथा मालेगाव पोलीस स्टेशानला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेले रामविलास वासुदेव गुप्ता (बक्कल नं. ९४४) परिसरात ह्यरामह्ण या नावाने परिचित आहेत. शिरपूर ते मालेगाव दररोज अपडाऊन करतांना मधात लागत असलेल्या जउळका रेल्वे येथे असलेल्या एका वृक्षाजवळ व बाजुलाच असलेल्या हॉटेलमधून खाद्य पदार्थ घेणे व तेथे पक्ष्यांसाठी ठेवण्याचे कार्य रामच्यावतिने गत दोन वर्षांपासून अविरत सुरु आहे.

आजच्या घडीला पक्ष्यांनाही त्यांची येण्याची चाहुल लागताच ते त्यांच्या आजुबाजुला फिरतांना दिसून येतात. ते नियमितप्रमाणे बाजुच्या हॉटैलमधून खाद्य पदार्थ घेवून ठरलेल्या ठिकाणी ठेवल्याबरोबर १०० ते १५० कावळयांसह इतरही पक्षी ते खाण्यासाठी येतात. बाजुलाच त्यांच्यासाठी पाण्याचीही व्यवस्था त्यांनी करुन ठेवली आहे. पक्ष्यांविषयी असलेल्या या रामच्या प्रेमाबाबत परिसरात त्यांचे कौतूक केले जात आहेत.कारंजा येथे गुरांसाठी चारा व पाण्याचीही केली होती व्यवस्थापशु-पक्ष्यांविषयी असलेल्या प्रेमापोटी रामविलास यांनी कारंजा येथे कर्तव्यावर असतांना २०१२ मध्ये गुरांसाठी चारा व्यवस्था व पाण्याचा हौद पोलीस स्टेशनसमोर बांधला होता. दररोज तेथेही त्यांची ते सेवा करायचे. आज ते तिथे नसल्याने हौद कोरडा पडला आहे.दर मंगळवार व शनिवारी असतो त्यांच्या बाजुला माकडांचा गराडा!जेथे हे जावे तेथे त्यांच्या बाजुला पशु- पक्ष्यांचा गराडा असतोच. मालेगाव येथील पोलीस स्टेशन आवारात महादेवाचे मंदिर आहे. येथे सुध्दा ते दर मंगळवार व शनिवारी चने, फुटाणे, शेंगदाणे झाडानजिक ठेवत असल्याने १५ ते २० माकडे ते सेवन करतांना दिसून येतात. विशेष म्हणजे दर मंगळवारी व शनिवारी त्याांच्या बाजुला माकडांचा गराडा दिसून येतो.ना-बोलता येते ना- सांगता येते. फक्त कृतीवरुन आपण समाधानी असल्याचे जाणवते., अश्या पशु-पक्ष्यांनी आपल्याला पाहून किलबिलाट करतात त्याचे समाधान वाटते. पक्षु-पक्ष्यांना अन्नदान करण्याचा आपण छंद जोपासला आहे. - रामविलास शर्मा

https://www.dailymotion.com/video/x844nq3