शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो धनगर समाजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: August 5, 2014 20:13 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो समाजबांधवांचा मोर्चा धडकला.

वाशिम : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती त्वरित लागू करण्यात याव्यात या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने सोमवार ४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो समाजबांधवांचा मोर्चा धडकला. सन १९५६ च्या काकासाहेब कालेलकर आयोगाने धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये क्रमांक ३६ वर ओरॉन, धनगर असा ४४२ क्रमांक दिलेला असून त्यांचा व्यवसाय शेळया, मेंढया चारणारी व जंगल वनामध्ये राहणारी जमात असे निर्देश दिलेले असतांना मागील ५८ वर्षांंपासून ही जमात आरक्षणापासून वंचित आहे. गेली ५८ वर्षांपासून केंद्रशासनाकडून या जमातीच्या विकासासाठी दरवर्षी निधी येतो परंतु या जमातीच्या एकाही व्यकितला लाभ मिळत नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून धनगर जमातीला ताबडतोब प्रमाणपत्र देणे व अनुसूचित जमातीला मिळणारे लाभ देण्यात यावी अशी मागणी धनगर समाजाने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचला तेव्हा जिल्हाधिकारी परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी अनंतकुमार पाटील, किसनराव मस्के, नारायण बोबडे, नारायण लांभाडे, बालू मुरकूटे, गजानन खटके, बबनराव मिटकरी, डॉ. गजानन ढवळे, डॉ. गजानन हुले, नंदु गोरे, सुरेश मुखमाले, रविभाऊ लांभाडे, दिपक तिरके, केशव गावंडे, संतोष मस्के, अजय पाटील, डॉ. विश्‍वासराव मेटकर आदींसह हजारो बाधंवांची उपस्थिती होती.