शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची सरासरी १७ टक्के तूट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 19:07 IST

वाशिम - यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने काही प्रमाणात पिकांना तारले  तर दुसरीकडे २३ आॅगस्टपर्यंत सरासरीच्या तुलनेत १७ टक्के पाऊस कमी पडल्याची नोंद प्रशासनाच्या दप्तरी आहे.

ठळक मुद्देपावसात सातत्य नसल्याचा फटका सर्वांनाच दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने काही प्रमाणात पिकांना तारले  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने काही प्रमाणात पिकांना तारले  तर दुसरीकडे २३ आॅगस्टपर्यंत सरासरीच्या तुलनेत १७ टक्के पाऊस कमी पडल्याची नोंद प्रशासनाच्या दप्तरी आहे.१ जून ते २३ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ६९१ मीमीच्या सरासरीने एकूण ४१५० मीमी पाऊस पडणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात या कालावधीत ४७३ मीमीच्या सरासरीने एकूण २८४२ मीमी पाऊस पडला. ही टक्केवारी ८३ असून, १७ टक्के तूट असल्याचे दर्शविते. २३ आॅगस्टपर्यंत सर्वात कमी पाऊस वाशिम तालुक्यात ६४ टक्के पडला आहे तर सर्वात जास्त पाऊस रिसोड तालुक्यात १३७ टक्के पडला आहे. मालेगाव तालुक्यात ९६ टक्के, मंगरूळपीर तालुक्यात ६३ टक्के, मानोरा तालुक्यात ६६ टक्के, कारंजा तालुक्यात ८० टक्के पाऊस झाला आहे.वाशिम तालुक्यात १ जून ते २३ आॅगस्ट या दरम्यान ६६२ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात ४२७ मीमी पाऊस पडला असून, २३ आॅगस्टपर्यंत ३६ टक्के तूट होती. मालेगाव तालुक्यात १ जून ते २३ आॅगस्ट या दरम्यान ५९७ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात ५७३ मीमी पाऊस पडला असून, २३ आॅगस्टपर्यंत ४ टक्के तूट होती.रिसोड तालुक्यात १ जून ते २३ आॅगस्ट या दरम्यान ५०९ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात ७०१ मीमी पाऊस पडला असून, २३ आॅगस्टपर्यंत हा पाऊस सरासरीपेक्षा ३७ टक्के जास्त पडला.मंगरूळपीर तालुक्यात १ जून ते २३ आॅगस्ट या दरम्यान ५४७ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात ३५० मीमी पाऊस पडला असून, २३ आॅगस्टपर्यंत ३७ टक्के तूट होती. मानोरा तालुक्यात १ जून ते २३ आॅगस्ट या दरम्यान ५३१ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात ३५५ मीमी पाऊस पडला असून, २३ आॅगस्टपर्यंत ३४ टक्के तूट होती. कारंजा तालुक्यात १ जून ते २३ आॅगस्ट या दरम्यान ५३६ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात ४३४ मीमी पाऊस पडला असून, २३ आॅगस्टपर्यंत २० टक्के तूट होती.