बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा जोरदार पावसाला सुरूवात झाली. विजांच्या कडकडाटासह पावसाने अचानक लावलेल्या हजेरीने वातावरणात आणखी गारवा निर्माण झाला. बुलडाणा, मोताळा, चिखली, लोणार आणि देऊळगाव राजा परिसरात मंगळवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. काही भागात तुरळक गारपीट झाल्याची माहितीही हाती आली आहे.
बुलडाण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस
By admin | Updated: February 11, 2015 01:23 IST