शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची रिपरिप कायम; पैनगंगा दुथडी भरून वाहली!

By admin | Updated: July 12, 2016 00:40 IST

वाशिम जिल्ह्यात पावसाची सरासरी ओलांडली : सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस.

वाशिम : जिल्ह्यात सर्वदूर गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कोरडेठाण्ण पडलेले नदी-नाले वाहते झाले असून वाशिम-हिंगोलीच्या सिमेवरील कन्हेरगांव नाका येथील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहली. खरिपातील पिकांसाठी अत्यंत पोषक असलेल्या या पावसामुळे यंदाचा मोठा दुष्काळ सोसणार्‍या शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने घटलेल्या पर्जन्यमानामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात भीषण दुष्काळ उद्भवला. नदी, नाले, सिंचन प्रकल्प यासह सर्वच जलस्त्रोत कोरडेठाण्ण पडल्यामुळे जिल्हावासीयांची प्रचंड तारांबळ उडाली. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यातील जून महिणाही मोठय़ा पावसाअभावी कोरडाच गेल्याने शेतकर्‍यांसह संपूर्ण जिल्हावासीयांमध्ये चिंता व्यक्त होत होती. अशातच ८ जुलैपासून दमदार पावसाने हजेरी लावली. पावसाची ही झड चौथ्या दिवशीही (११ जुलै) कायम असून यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले, सिंचन प्रकल्पांची पाणीपातळी समाधानकारकरित्या वाढली आहे. ३५ मिलीमिटर पावसाची नोंदजिल्ह्यात सोमवार, ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ३५ मिलीमिटर पाऊस कोसळल्याची नोंद घेण्यात आली. यात वाशिम ३६ मिलीमिटर, मालेगाव ३८ मिलीमिटर, रिसोड ३0 मिलीमिटर, मंगरुळपीर ३६ मिलीमिटर, मानोरा २४ मिलीमिटर; तर कारंजा येथे ४४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. यायोगे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात एकंदरित सरासरी ३0४ मिलीमिटर पाऊस कोसळला आहे.