शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने फिरवली पाठ; शेतकरी हवालदिल

By admin | Updated: July 1, 2014 02:37 IST

वाशिम जिल्हय़ात ९६ टक्के शेतकर्‍यांच्या पेरण्या रखडल्या

वाशिम : जून महिना संपला तरी अद्यापपर्यंत जिल्हय़ात शेतकर्‍यांना दिलासा देणारा पाऊस पडलेला नाही. ओलिताची थोडीफार सोय असणार्‍या काही भागातील शेतकर्‍यांनी चार टक्के क्षेत्रात पेरण्या केल्या होत्या; परंतु आता विहिरीचे पाणी आटल्याने त्यांच्या पेरण्या पाण्याअभावी उलटण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित ९६ टक्के शेतकर्‍यांच्या पेरण्या रखडल्या असून, यावर्षीचा खरीप हंगाम पावसाअभावी हातचा जाण्याच्या भीतीने जिल्हय़ातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.जिल्हय़ात मागील वर्षी सन २0१२ च्या पावसाळय़ात जिल्हय़ाच्या वार्षिक पावसाच्या सरासरीच्या १५0 टक्के एवढा पाऊस पडला होता. मागील वर्षी ६ जूनलाच पावसाची दमदार सुरुवात झाली होती. जून महिन्यातच पावसाळय़ात पडलेला पाऊस वार्षिक सरासरीच्या निम्म्या एवढा पडला होता. त्यामुळे जून अखेर ८७ टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. पिकेदेखील चांगली वाढीला लागली होती. यावर्षी स्थिती अगदी उलट आहे. जून महिन्यात जिल्हय़ात कुठे कुठे अगदी तुरळक स्वरुपात पाऊस पडला आहे. खरिपाच्या लागवडीखाली येणार्‍या जिल्हय़ातील ४ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रापैकी थोडीफार ओलिताची सोय असलेल्या १७ हजार हेक्टर चार टक्के क्षेत्रात शेतकर्‍यांनी जूनमध्ये पाऊस येणारच, असे गृहीत धरुन पेरण्या केल्या होत्या. परंतु संपूर्ण जून महिना उलटला तरीही अगदी नाममात्र आणि सरी स्वरुपाचा पाऊस झाला. मुरवणी स्वरुपाचा पाऊस अद्यापही झाला नसल्याने जिल्हय़ातील जवळपास चार लाख १0 हजार हेक्टर टक्के क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या आहेत. उडीद, मुगाच्या पेरणीचा कालावधी आता उलटून गेला असून, आता जुलै महिन्यात पाऊस आला तर शेतकर्‍यांना सोयाबीन, कापूस, तूर व संकरित ज्वारीची पेरणी करावी लागणार आहे. तसेच यापूर्वी पेरणी केलेल्या १७ हजार हेक्टर क्षेत्रातील पेरण्या सध्या पावसाअभावी करपून जात असल्याने त्या शेतकर्‍यांना दुबार पेरण्या कराव्या लागणार आहेत. एकंदरीत आता जुलै महिन्यात येणार्‍या पावसानंतर जिल्हय़ातील जवळपास १00 टक्के शेतकर्‍यांना पेरण्या कराव्या लागणार आहेत. या दृष्टीने शेतकर्‍यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या असून, पाऊस कधी येतो, याची प्रतीक्षा हवालदिल शेतकरी करीत आहेत.