शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मृत मातेला कवटाळून माकडाच्या पिल्लाचा आक्रोश 

By admin | Updated: January 13, 2017 18:18 IST

गरुळपीर येथे झाडावरून पडल्यामुळे मृत पावलेल्या माकडीणीचा मृत्यू झाला. यावेळी आपली आई उठत नसल्याचे पाहून तिच्या पिल्लाने मृतदेह कवटाळून आक्रोश केला.

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 13 - मंगरुळपीर येथे झाडावरून पडल्यामुळे मृत पावलेल्या माकडीणीचा मृत्यू झाला. यावेळी आपली आई उठत नसल्याचे पाहून तिच्या पिल्लाने मृतदेह कवटाळून आक्रोश केला. आईला उठवण्याचे तो सर्व प्रकारे प्रयत्न करू लागला. मात्र आपली आई सोडून गेल्याचे या पिल्लाला काही समजेना. जवळपास 2 तास हे माकड त्याच्या आईला कवटाळून होते.  
 
मागील वर्षभरापासून शहर आणि गावलगतच्या शेतशिवारात माकडांचे कळप फिरत आहेत. झाड-पाला खाऊन जगणारी ही माकडे झाडाच्या फांद्यावर इकडून तिकडेसारखी उड्या मारत असतात. शहरातून जाणा-या मानोरा मार्गावरही काही दिवसांपासून माकडांचा कळप वावरत आहे. शुक्रवार 13 जानेवारी रोजी त्यातील एका माकडीणीचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाला. 
 
त्यावेळी हे लहान पिल्लूही तिच्या कुशीत होते.  सुदैवाने ते पिल्लू बचावले. आपली आई उठत नाही, हे पाहून तिच्या पिल्लाने आक्रोश सुरू केला. ते दृश्य पाहून येणा-या-जाणा-यांचेही डोळे पाणावत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक खोडके यांनी त्या पिल्लाला आईपासून दूर करत त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली व त्याला घरी नेले.