शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

गैरमार्गाने लर्नींग लायसन्स प्राप्त करणारे कारवाईच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 11:52 IST

learning license : शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी मूळ उमेदवारांऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना (लर्निंग लायसन्स) ऑनलाईन पद्धतीने जारी करण्याची प्रणाली १४ जूनपासून कार्यान्वित करण्यात आली; मात्र काही ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी मूळ उमेदवारांऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तथापि, गैरमार्गाने अनुज्ञप्ती प्राप्त केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यांना अनुज्ञप्ती मिळविण्यासाठी कायमस्वरूपी अपात्र ठरेल, अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी कळविले आहे.लोकाभिमुख सुविधांचा गैरवापर होऊ नये, यासाठी संगणकीय प्रणालीत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या प्रणालीचा गैरवापर करून लर्निंग लायसन्स प्राप्त करणाऱ्या अर्जदाराची तपासणी करण्यात येवून गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच मोटार वाहन कायदा १९८८ कलम १९ (इ) अन्वये अनुज्ञप्ती प्राप्त करण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरेल, अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल. गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करण्यास सहाय्य करणाऱ्या अनधिकृत व्यक्ती, मध्यस्थ, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, सायबर कॅफे यांच्याविरुद्धदेखिल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल. मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांची अनुज्ञप्ती रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे सय्यद यांनी सांगितले. नागरिकांनी गैरप्रकार करून शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) प्राप्त करून देणाऱ्या व्यक्ती, संस्थांची माहिती  कळविण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस