शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन!

By admin | Updated: October 16, 2015 02:01 IST

कोरडवाहू शेतकरी संकटात; जमिनीत ओलच नाही!

वाशिम: खरिपात निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरलेला बळीराजा रब्बी हंगामात स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नातून मशागतीच्या कामात व्यस्त आहे. कृषी विभागाने एक लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन केले आहे, तर दुसरीकडे सिंचनाची सुविधा असणार्‍या शेतकर्‍यांसमोर नादुरूस्त विद्युत रोहित्राने नवीन संकट निर्माण केले आहे. निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचून गेला आहे. अनियमित व अल्प पावसामुळे खरिपातील पिके हातची गेली. शेतमालाच्या उत्पन्नात प्रचंड घट येत असल्याने लागवड खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर ओढवली आहे. आता शेतकर्‍यांची सर्व भिस्त रब्बी पिकावर आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी होणार आहे. सर्वाधिक क्षेत्रफळावर अर्थात ७0 हजार ८९१ हेक्टरवर हरभर्‍याच्या पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गहू पिकाचा पेरा २६ हजार हेक्टर, रब्बी ज्वारी दोन हजार हेक्टर, मका ४00 हेक्टर, सूर्यफूल १६00 हेक्टर असे एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन केले. गतवर्षी ७७ हजार ११ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस असतानाही कृषी विभागाने एक लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज वर्तविला आहे. रिसोड तालुक्यात सर्वाधिक ३0 हजार ९00 हेक्टरवर पेरणीचा अंदाज वर्तविला असून, त्याखालोखाल वाशिम २१ हजार ४00 हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे.