शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘रानमाळ-२०१७’ महोत्सवाला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद!

By admin | Updated: May 30, 2017 01:43 IST

सहभागी शेतकऱ्यांच्या मालाची विक्री ठप्प : स्थळ चुकीचे निवडल्याच्या प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभाग व ‘आत्मा’मार्फत तब्बल साडेतीन लाख रुपये खर्चून आयोजित करण्यात आलेल्या ‘रानमाळ महोत्सव-२०१७’ला ग्राहकांमधून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सोमवार, २९ मे रोजी दिसून आले. यंदा या महोत्सवाकरिता निवडलेले स्थळ पूर्णत: चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत वाशिम येथील स्वागत लॉनमध्ये २८ मे पासून ३० मे पर्यंत ‘रानमाळ महोत्सव २०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी व शेतकरी उत्पादक गटांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांची थेट भेट घालून देत ग्राहकांना कुठल्याही मध्यस्थाविना भेसळविरहित धान्य, फळे, भाजीपाला यासह इतर उत्पादने मिळवून देणे तद्वतच यायोगे शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाचे योग्य दाम मिळावे, हा त्यामागील उद्देश आहे. या महोत्सवासाठी दरवर्षी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानाची निवड केली जाते. तेथे यापूर्वी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने शेतकऱ्यांच्या मालाची विक्रीदेखील चांगल्या प्रकारे झाली होती. यंदा मात्र ‘आत्मा’ने स्थळ बदल करीत जुने शहरातील स्वागत लॉनमध्ये हा महोत्सव आयोजित केला. त्या ठिकाणी ग्राहक फिरकायलाही तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल तसाच पडून राहत असून, महोत्सवस्थळी शुकशुकाट जाणवून येत आहे. परिणामी, खेड्यापाड्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असल्याचे दिसून आले.मान्सूनपूर्व वादळी पावसाची शक्यता असल्यामुळेच सुरक्षित स्थळ म्हणून स्वागत लॉनची महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. जबाबदारी म्हणून रानमाळ महोत्सवाचा युद्धस्तरावर प्रचार-प्रसार करूनही ग्राहकांचा प्रतिसाद का मिळत नाही, हे कळायला मार्ग नाही. - डी.एल.जाधव, प्रकल्प संचालक, ‘आत्मा’