शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST

................... राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती ताेंडगाव : वाशिम ते अकोला यादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. मालेगावपासून वाशिमपर्यंतच्या ...

...................

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती

ताेंडगाव : वाशिम ते अकोला यादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. मालेगावपासून वाशिमपर्यंतच्या रस्तानिर्मितीला चांगलीच गती मिळाली असून, हे काम लवकरच पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

.....................

कालवे नादुरुस्त; पाण्याचा अपव्यय

अनसिंग : अनसिंग परिसरात सध्या रब्बीच्या पिकांची स्थिती चांगली आहे. दुसरीकडे पिकांच्या सिंचनासाठी धरणामधील पाणी घेण्याकरिता असलेले कालवे नादुरुस्त झाल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे.

........................

विहीर योजनेबाबत लाभार्थी संभ्रमात

शेलुबाजार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहीर आणि सिंचन साधने उपलब्ध करून दिली जातात; मात्र गतवर्षी अर्ज मागविण्यात आले नसल्याने लाभार्थी संभ्रमात सापडले आहेत.

..................

विहिरीत पडलेल्या नागासह दोन सर्पांना जीवदान

पोहरादेवी : अभयखेडा येथे मनवर यांच्या घराजवळ आढळून आलेल्या गवत्या जातीच्या सापासह गिरोली येथील बबलू डाखोरे यांच्या विहिरीत आढळून आलेल्या नागाला निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या सदस्यांनी सुरक्षित पकडून जंगलात सोडत जीवनदान दिले.

................

मुख्य रस्त्यावरील गतिराेधक अडचणीचे

कामरगाव : कामरगाव ते अमरावती मार्गावर असलेले गतिराेधक अडचणीचे ठरत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. गावानजीक असलेले गतिराेधक धाेक्याचे ठरत असल्याने ते काढण्याची मागणी हाेत आहे.

....................

रस्त्याच्या कडेला ऑटाे

धनज : धनज फाट्यावर रस्त्याच्या कडेला ऑटाे उभ्या केल्या जात असल्याने वाहतूक प्रभावित हाेत आहे. एका बाजूने ऑटाे उभ्या करण्याऐवजी चक्क रस्त्यावर ऑटाे उभ्या केल्या जात असल्याने प्रवाशांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

................

हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

उंबर्डा बाजार : कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार परिसरात गेल्या आठवडाभरापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे पीक सुकण्याच्या स्थितीत असून, शेतकरी पुन्हा चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. या पिकावर घाटे अळीसह इतर किडींचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे.