शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरातून पर्यावरण रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:46 IST

समग्र शिक्षा योजनेंतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. यासाठी राज्य शासनाला दरवर्षी सुमारे ...

समग्र शिक्षा योजनेंतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. यासाठी राज्य शासनाला दरवर्षी सुमारे २०० कोटी रुपयांंपेक्षा अधिक खर्च करावा लागतो. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची योग्यरीतीने जपणूक करतात व त्यांना सुस्थितीत ठेवतात. अशा पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्याचा पुनर्वापर केल्यामुळे कागदाची बचत होईल आणि पर्यायाने कागद निर्मितीतून होणारा पर्यावरणाचा ºऱ्हासही थांबेल, हा विचार करून राज्यशासनाने पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय ८ डिसेंबर रोजी घेतला आहे. राज्य शासनाच्या या प्रकल्पानुसार वाशिम जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ‘ओल्ड बुक बँक’ हे अभियान राबविण्याची तयारी केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ओल्ड बुक बँक अंतर्गत गतवर्षीच्या सत्रात विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या पुस्तकांचे संकलन करून त्यातील सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचे वितरण पुढील सत्रात केले जाणार आहे.

-----------------

गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना सूचना

शासनाच्या पाठ्यपुस्तक पुनर्वापर या पथदर्शी प्रकल्पानुसार जिल्ह्यात ‘ओल्ड बुक बँक’ अभियानांतर्गत गतवर्षीच्या सत्रातील पुस्तकांचे संकलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करून सुस्थितीत असलेल्या पुस्तकांची जपणूक करून ते पुढील वर्षी विद्यार्थ्यांना वितरित करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. या संदर्भात सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखांसह मुख्याध्यापकांना सूचनाही जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

---------------

इतरही विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना गतसत्रात मोफत पुस्तके वितरित करण्यात आली. त्यांच्याकडील चांगल्या स्थितीत असलेल्या पुस्तकांचे संकलन जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून केले जाणार आहेच. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांनी गतवर्षी बाजारातून पुस्तके विकत घेतली अशा विद्यार्थ्यानीही चांगल्या स्थितीतील पुस्तके संबंधित शाळेत देऊन पर्यावरण रक्षणात हातभार लावावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

------------------------

तालुकानिहाय वितरित पुस्तके व विद्यार्थी

तालुका विद्यार्थी पुस्तके

कारंजा १९४४४ १०९६९१

मालेगाव २०५९९ ११५८७५

मं.पीर १७३४७ १००४९०

मानोरा १६५३३ ९२३०९

रिसोड २६१०३ ११७५३३

वाशिम २९०१७ १६७२१४

--------------------------

एकूण १२९०४३ ७०३११२

---------

कोट: शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पाठ्यपुस्तक पुनर्वापर या पथदर्शी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ओल्ड बुक बँक’ हे अभियान राबविले जाणार आहे. यात गतवर्षी मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमातील पुस्तकांचे संकलन करून योग्यस्थितीतील पुस्तकांचे पुन्हा वाटप केले जाईल. इतरही विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडील चांगल्या स्थितीतील पुस्तके शाळात जमा करून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा.

-गजाननराव डाबेराव, प्र. उपशिक्षणाधिकारी (प्राथ.)

जि.प. वाशिम