शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित ठाण्यांचे कार्यान्वयन रखडले

By admin | Updated: September 17, 2014 01:25 IST

कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्याचा निर्णय पदमान्यतेच्या पुढे सरकलाच नाही.

वाशिम : जिल्हा निर्मितीला १७ वर्षाचा कालावधी लोटला. वाढते गुन्ह्याचे प्रमाण व वाढती लोकसंख्या लक्षात घेता जिल्हा पोलिसदलाकडून तीन वर्षांपूर्वी तीन नवीन पोलिस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र त्याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे अगोदर पदमान्यता मिळेलेल्या कारंजा पोलिस ठाण्याचा प्रश्नसुद्धा अंधातरीच राहीला आहे. वाशिम जिल्हा निर्मीतीपासुन जिल्हयात वाशिम, मंगरूळपीर, कारंजा या तीन पोलिस उपविभागात ११ पोलीस ठाणे आहेत. जिल्हा निर्मितीनंतर वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्याची तेवढी भर पडली. यामुळे वाशिम पोलीस ठाण्यावरील कामाचा ताण कमी झाला. त्यानंतर मंगरूळपीर, कारंजा, धनज बु. पोलिस ठाण्यांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी शेलुबाजार, कारंजा ग्रामीण व कामरगाव पोलिस स्टेशनची मागण्ी पुढे आली. या मागणीला ऑक्टोबर २0११ मध्ये प्रस्तावाचे रूप देऊन तीनही पोलिस स्टेशनच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनदरबारी सादर केला. या प्रस्तावाच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून तीनपैकी कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन निर्मितीसाठी हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर शासनाने कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या निर्मिती व कार्यन्वीततेसाठी आवश्यक पदमान्यता देण्याचे काम केले. मात्र त्यानंतर नवीन पोलिस ठाण्याचे काम रखडलेलेच आहे. कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनला शासनाने तत्वत: मंजुरात देवून पदांनाही मान्यता दिली, परंतु पोलीस स्टेशनच्या कार्यान्विणासाठी आवश्यक नोटीफिकेशन निघाले नसल्याने नवीन पोलिस ठाण्याचा प्रश्न रखडला असल्याचे प्रभारी पोलिस उपअधिक्षक आर. एस. पाटील यांनी सांगीतले. जऊळका पोलिस स्टेशनअंतर्गंत येत असलेल्या ४६ गावांशिवाय किन्हीराजा पोलिस चौकी अंतर्गत येणार्‍या गावांचा शेलुबाजार पोलिस स्टेशनमध्ये समावेश करता येवू शकतो. त्यामध्ये पिंप्री अवगण, सोयता, भोयता, दुधखेडा आदी गावांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.नागपूर - औरंगाबाद द्रुतगती महामार्गावरील प्रस्तावित कामरगाव पोलिसठाण्यची निर्मिती झाल्यास गुन्हांवर अंकुश बसुन कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनसह धनज बु. पोलीस स्टेशनवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल.कारंजा पोलिस स्टेशन अंतर्गत ७३ गावातील संरक्षणाची जबाबदारी ८४ पोलीस अधिकारी कर्मचारी साभाळताहेत. मंजुरात १0३ अधिकारी कर्मचार्‍यांच्या पदांना असली तरी आधीच कामाचा प्रचंड मोठा आवाका असलेल्या कारंजा पोलीस स्टेशनच्या दिमतीला कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनची कार्यान्वितता तातडीने क्रमप्राप्त आहे.