अनसिंग येथील अनुसूचित जाती, जमातीच्या काही भूमिहीन बेघर नागरिकांचे राहते घर गत काही महिन्यांपूर्वी पाडण्यात आले. निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी प्रस्ताव सादर करूनही याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप मानवी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष जगदीश इंगळे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष पंचफुला गायकवाड व लाभार्थींनी ११ फेब्रुवारी रोजी केला. शासनाच्या सर्वांसाठी घरे २०२० या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा शासन निर्णय असतानाही अनसिंग येथील भूमिहीन बेघर लोकांवरच अन्याय का असा प्रश्न लाभार्थींनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित केला. निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे अन्यथा अनसिंग येथे डेरा टाकुन राहुटी आंदोलन करण्याचा इशारा लाभार्थींनी दिला.
अतिक्रमण नियमानुकूलचे प्रस्ताव रखडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:39 IST