शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयातच स्वीकारणार जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव

By admin | Updated: October 22, 2016 02:26 IST

तीनही ठिकाणी कर्मचा-यांची नियुक्ती; इच्छुकांना दिलासा.

वाशिम, दि. २१- नगर परिषद निवडणूक राखीव प्रवर्गातून लढविणार्‍या इच्छुक उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव त्या-त्या ठिकाणी स्वीकारले जाणार आहेत.जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत राखीव प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र अथवा पडताळणी समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पोच पावती जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव स्वीकारून त्यांना पोच पावती देण्यासाठी त्या-त्या नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश अकोला येथील अमरावती विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक दोनने निर्गमित केल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.वाशिम नगर परिषदकरिता वाशिम तहसील कार्यालय येथे ए. बी. वेलकर, मंगरूळपीर नगर परिषदकरिता मंगरूळपीर तहसील कार्यालय येथे जी. जी. जाधव व कारंजा नगर परिषदकरिता कारंजा तहसील कार्यालय येथे एस. एम. चांदगुडे यांची जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या कालावधीत म्हणजेच २४ ते २९ ऑक्टोबर २0१६ या कालावधीत नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहून पडताळणी प्रस्ताव स्वीकारून त्याची रीतसर पावती संबंधितांना देतील. जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकारण्यासाठी नियुक्त कर्मचार्‍यांसाठी संबंधित तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे व त्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिले आहेत.