शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

इतिवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली!

By admin | Updated: July 19, 2016 02:14 IST

मानोरा नगर पंचायतमध्ये कर्मचा-यांची वानवा, जिल्हाधिका-यांकडे नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा.

वाशिम : मानोरा नगर पंचायतला कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने आणि कर्मचार्‍यांची वानवा असल्याने सभेचे इतवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली आहे. यासंदर्भात नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देत नगर पंचायतच्या समस्यांचा पाढा वाचला.१७ जुलै २0१५ रोजी मानोरा ग्रामपंचायत विसजिर्त करून नगर पंचायतला मान्यता देण्यात आली. १७ जुलै २0१६ रोजी मानोरा नगर पंचायतला एक वर्षे पूर्ण झाले. मात्र, विकास कामे ठप्प आहेत. मानोरा शहरात विविध विकासात्मक कामे, नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा आदी कामे सुरळीत होण्यासाठी नगर पंचायतला आवश्यक ते मनुष्यबळ आणि कायमस्वरूपी मुख्याधिकारी अद्यापही मिळाले नाही. प्रभारी मुख्याधिकारी मानोरा येथे येत नसल्याने विकासात्मक कामांना बाधा निर्माण झाली. नगर पंचायत सभेचे कामकाज करण्याकरिता सचिव म्हणून कोणीही नसल्यामुळे सभा कशा पद्धतीने घ्याव्या? असा प्रश्न नगर पंचायत अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांसमोर निर्माण झाला. सभेचे इतवृत्त लिहिण्यास कोणीही नाही. बजेटची सभा झाली. परंतु आजपर्यंतही इतवृत्त बनविले नाही. शहराचा विकास करण्याकरिता ह्यडीपीआरह्ण तयार करुन त्याची मंजुरी जिल्हाधिकार्‍यांकडून घेणे आवश्यक आहे. सदर कामदेखील अद्यापपर्यंत झाले नाही. अधिकारी व कर्मचारी कायमस्वरुपी नसल्याने आणि प्रभारी कर्मचारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने सभेचे इतवृत्त बनविण्याची कार्यवाही थांबली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पदाधिकार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली.