शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाची मुल्यांकन प्रक्रिया धिम्यागतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:26 IST

वाशिम: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील ५४ गावांमधील १४०९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, त्यास शेतकºयांमधून अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले असतानाच मुल्यांकन प्रक्रिया देखील धिम्यागतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. १० आॅक्टोबरपर्यंत केवळ २१ गावांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया आटोपली असून २५ हेक्टरच्या आसपास भूसंपादन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देवाशिम जिल्हा: भूसंपादनही प्रलंबितजिल्ह्यातील ५४ गावांमधील १४०९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील ५४ गावांमधील १४०९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, त्यास शेतकºयांमधून अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले असतानाच मुल्यांकन प्रक्रिया देखील धिम्यागतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. १० आॅक्टोबरपर्यंत केवळ २१ गावांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया आटोपली असून २५ हेक्टरच्या आसपास भूसंपादन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपूर ते मुंबई या ७१० किलोमिटर अंतराचा समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातील ५४ गावांमधून जात असून यामुळे कारंजा, मालेगाव, मंगरूळपीर आणि रिसोड तालुक्यांमधील जमिनी संपादित केल्या जात आहेत. असे असले तरी महामार्ग निर्मिती प्रक्रियेत प्रारंभीपासूनच शेतकºयांच्या विरोधासह विविध स्वरूपातील अडचणी उद्भवल्या असून त्या आजपावेतो कमी झालेल्या नाहीत. अशातच जिल्हास्तरीय समितीची मंजुरात नसल्याने ५४ पैकी तब्बल ३३ गावांच्या मुल्यांकन रखडले असून त्यामुळे पुढची प्रक्रिया देखील खोळंबली आहे. ज्या २१ गावांचे मुल्यांकन आटोपले, त्या गावांमधील भूसंपादन करित असताना सुमारे ५० टक्के जमिनी विविध प्रकारच्या वादात अडकल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यावर मात करून प्रशासनाला महामार्ग निर्मितीचा मार्ग सुकर करावा लागणार आहे.