शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांचा ‘बंद’

By admin | Updated: July 5, 2016 00:57 IST

वाशिम जिल्ह्यातील २७0 शाळांचा आंदोलनात सहभाग; प्रलंबित मागण्यांची पुर्तता करण्याची मागणी.

वाशिम : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी खासगी शिक्षण संस्था चालकांच्या राज्यस्तरीय संघटनेने ४ जुलै रोजी माध्यमिक शाळा बंदची हाक दिली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील १00 टक्के शाळा सहभागी झाल्या. या संपामुळे विद्यार्थ्यांंंना आल्या पावली परत जावे लागले. घोषित शाळांना प्रचलित नियमानुसार पात्र टप्पा अनुदान देण्यात यावे, उच्च माध्यमिक शाळांना घोषीत करुन त्वरित अनुदान देण्यात यावे, सन २00४ ते २00५ पासूनचे थकीत वेतनतर अनुदान पुर्वीप्रमाणे सर्व शाळांना त्वरित देण्यात यावे, प्राथमिक शाळेत लिपीक व सेवकांची पदे मान्य करावी, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या बाबतीत नेमलेल्या समितीचा अहवाल स्विकारुन त्यानुसार तात्काळ पद भरती सुरु करावी, २५ टक्के राखीव जागावर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांंंच्या शिक्षण शुल्कांच्या रक्कमेचा परतावा शाळांना त्वरित मिळावा, विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांंंना अनुदानित शाळेप्रमाणे शालेय पोषण आहार व पाठयपुस्तकांचा लाभ द्यावा, २0 पटांच्या आतील शाळा बंद करण्यात येवू नये यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी खासगी माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यात २७0 च्या आसपास खासगी माध्यमिक शाळा असून, सोमवारच्या संपात या सर्व शाळा सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. शाळा बंद असल्याचे पाहून विद्यार्थ्यांंंना परत जावे लागले. संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष भऊसाहेब सोमटकर सचिव अँड. किरणराव सरनाईक, देवीदास नागरे, प्रा. भाऊसाहेब काळे, अशोक कांबळे, नारायण काळबांडे, अनिल गवळी, बि.टी. बिल्लारी, देवीदास कापूरे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अशोकराव ठाकरे, विजय शिंदे, रविंद्र खुणे, विनोद नरवाडे, मंगेश धानोरकर, उदय दर्यापूरकर तसेच शिक्षक संघटनेचे बाळासाहेब गोटे, राजु नंदकुले, राजकुमार बोनकिल्ले, एस. एल. राठोड, विनायक उज्जेनकर, गोविंद चतरकर, अनंत सुपनात, महादेव बांगर, शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश पसारकर, गिरीष जिचकार, तुकाराम बाकडे, विष्णू बाजड, रूपेश मुंदडा, कदम, बोराळकर, ठाकरे, रामराव कायंदे, मधुकर चवरे, गणेशराव देशमुख आदींनी या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.