वाशीम: जिल्ह्यातील कारंजा शहरातील गवळीपुरा परिसरात जुम्मा चौधरी व रवींद्र ठोके या दोन्ही नागरिकांच्या घरावर २३ डिसेंबर रोजी छापा टाकून गावठी हातभट्टीची दारू व देशी क्वॉटर असे एकूण ९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी.बी. तडवी यांनी दिली. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकरराव सोळंके, जमादार बुद्धू रेघीवाले, जमादार प्रदीप चव्हाण, शिपाई गजानन गोटे यांनी दोन्ही आरोपीकडून १२0 लिटर सडवा मोहामाच व १0 लिटर दारू तसेच देशी-विदेशी दारूचे ५७ तुकडे असे एकूण ९ हजार ७0 रुपयांचा माल जप्त केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक तडवी यांनी दिली.
देशी दारूच्या अड्डय़ावर छापा
By admin | Updated: December 24, 2015 02:43 IST