शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर सरपंचपदी राजकन्या अढागळे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:49 IST

शिरपूर जैन : १६ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत राजकन्या संतोष अढागळे यांची सरपंचपदी तर ...

शिरपूर जैन : १६ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत राजकन्या संतोष अढागळे यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी असलम परसुवाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत १७ पैकी १२ सदस्य हे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोकराव अंभोरे यांचे क्रांती पॅनल, अशोकराव देशमुख यांची तिसरी आघाडी व सलीम गवळी यांच्या जय हो पॅनलचे निवडून आले आहेत. येथील सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते. यात राजकन्या अढागळे या एकमेव अनुसूचित जातीमधून निवडून आलेल्या सदस्य आहेत. विरोधी एकता गटातून केवळ पाच सदस्य निवडून आले. त्यातही सिंधू कांबळे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी गटात प्रवेश केला. त्यामुळे १६ फेब्रुवारीला झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत राजकन्या यांचाच राजयोग बिनविरोध आला. तर उपसरपंचपदी असलम परसुवाले यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली. त्यामुळे शिरपूर ग्रामपंचायतवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोकराव आंभोरे, तिसऱ्या आघाडीचे अशोकराव देशमुख व जय हो गटाचे सलीम गवळी यांच्या गटाचा झेंडा फडकला. सरपंच उपसरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंचांचा सत्कार केला. सरपंचत-उपसरपंच निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून पुरवठा निरीक्षक रवी राऊत यांनी व ग्राम विकास अधिकारी भागवत भुरकाडे यांनी काम पाहिले. (वा.प्र.)