शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा

By admin | Updated: March 21, 2017 03:07 IST

मुद्रा योजनेविषयी तालुका स्तरावर मार्गदर्शन ; उद्या मालेगाव येथे मेळावा

वाशिम, दि. २0- सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योग, व्यापार व व्यवसाय उभारणीसाठी सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रसार, प्रचारासाठी जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावर प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. या अंतर्गत २१ मार्च २0१७ रोजी सकाळी ११ वाजता रिसोडमधील गुजरी चौक येथील नगरपरिषद प्राथमिक शाळेमध्ये तालुकास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्हा अग्रणी बँक व तहसीलदार कार्यालयांच्यावतीने हे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.२२ मार्च २0१७ रोजी मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसर, २३ मार्च २0१७ रोजी कारंजा तहसीलदार कार्यालय परिसर, २४ मार्च २0१७ रोजी मंगरूळपीर, २७ मार्च २0१७ रोजी मानोरा तहसीलदार कार्यालय परिसर येथे तालुकास्तरीय व २९ मार्च २0१७ रोजी वाशिम येथे जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा होणार आहे. या मेळाव्यांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहून प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कर्जाचे अर्ज स्वीकारतील.प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून लघु व्यवसाय व उद्योगांना मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करण्यात येते. वैयक्तिक व्यावसयिक, खाजगी व्यवसाय, भागीदारीतील व्यवसाय, भागीदारीतील व्यवसाय, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी यासारख्या विविध व्यवसायांना मुद्रा योजनेतून कजार्चा लाभ मिळू शकतो; मात्र अर्जदार कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसला पाहिजे. नवीन उद्योग सुरु करणे अथवा सुरु असलेला उद्योग वाढविणे, व्यावसायिक गरजा पूर्ण करून उत्पन्नात वाढ करण्यासाठी आवश्यकतेनुसार मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी तसेच या योजनेंतर्गत कर्ज प्राप्त करून घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे अवाहन जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीने केले.