किन्हीराजा (वाशिम) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सदस्यासह मनसे कार्यकर्त्यांनी भेट दिली असता प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अनुपस्थित आढळून आल्याची घटना ९ डिसेंबर रोजी उघडकीस आली. गत मंगळवारी सुध्दा गरोदर माता लसिकरण होवू शकले नाही.९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता जि.प.सदस्य चंदू जाधव, मनसे कार्यकर्ते अमोल देशमाने यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता लिपीक अनेक दिवसांपासून गायब असून आरोग्य सेविका काळने कर्तव्यावर आढळून आल्या नाहीत. अमानवाडीच्या आरोग्य सेविका यांना मेडशी प्रा.आ.केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. तर येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.कुळकर्णी यांना शेलुबाजार प्रा.आ.केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले असल्याचे आढळून आले त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुर्णता कोलमडली असल्याचे दिसून आले. याच कारणाने दि.२ डिसेंबरला दर मंगळवारी होणारी महिलांचे लसीकरण ही घेण्यात आले नाही.सुट्टीवर राहूनही हजेरी पत्रकावर कर्मचारी स्वाक्षरी करतात असेही यावेळी दिसून आले आल्याची माहिती चंदू जाधव यांनी दिली. यावेळी उपस्थित डॉ.नागोराव थोरात यांच्या माहितीनुसार वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकांच्या प्रतिनियुक्ती बाबत वरिष्ठांकडे वारंवार मागणी केली व प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहारही केला आहे गेल्या ११ महिन्यांपासून प्रा.आ.केंद्रात येत नसल्यामुळे लिपीक देशमुख यांच्यावर एकतर्फी कारवाई करावी असे पत्रही वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे. १ ते ५ डिसेंबर पर्यंत आरोग्य सेविका काळणे या अर्जीत रजेवर होत्या. त्यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्यामुळे त्य बाहेरगावी आहेत. कामचुकार कर्मचार्यांवर योग्य कारवाई करुन प्रतिनियुक्ती रद्द करावी असेही पत्र आपण वरिष्ठांकडे दिली असल्याची माहिती दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र वा-यावर
By admin | Updated: December 9, 2014 23:30 IST