शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

वाशिम जिल्ह्यात ११ आॅक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:13 IST

वाशिम: आगामी सण, उत्सव तसेच ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, याकरिता ११ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्था जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आगामी सण, उत्सव तसेच ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, याकरिता ११ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.२ आॅक्टोंबरपर्यंत नवदुर्गा उत्सव आणि ३० सप्टेंबर  रोजी दसरा उत्सव, १ व २ आॅक्टोंबर २०१७ रोजी मोहरम  उत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर पर्यंत सार्वजनिक मिरवणूक काढून नवदुर्गांचे विसर्जन करण्यात येणार आहे. ७ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता मतदान होणार असून ९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या कालवधीत कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, याकरिता ११ आॅक्टोंबरपर्यंत कालावधीत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशी शस्त्रे अथवा तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.