शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वसूचना न देता तोडला जातोय कृषीपंपाचा वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST

विधानसभेत २ मार्च रोजी झालेल्या चर्चेदरम्यान महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिली होती; ...

विधानसभेत २ मार्च रोजी झालेल्या चर्चेदरम्यान महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिली होती; मात्र नऊच दिवसांनंतर १० मार्च रोजी अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थगिती उठवून विद्युत देयक वसुलीचे फर्मान सोडले. यासंबंधीचे आदेश जिल्हास्तरावर धडकले असून, वाशिम मंडळाकडून थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात १२ हजार १५६, रिसोड तालुक्यातील ११ हजार ५८६, मंगरूळपीर ९ हजार २०६, कारंजा ११ हजार ३७२, मानोरा ७ हजार ३१८ आणि मालेगाव तालुक्यात १० हजार ५८, अशा एकूण ६१ हजार ६९६ कृषिपंपधारक ग्राहकांना ६ हजार ८६१ कृषिपंप रोहित्रांच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी ११ मार्चअखेर थकबाकीदार असलेल्या १० हजार ४६२ कृषिपंपधारक ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून कापण्यात आला. त्यापैकी ६० ग्राहकांनी चार लाख रुपये रकमेचा भरणा केला असून, उर्वरित ग्राहकांचा विद्युत पुरवठा ठप्प झाला आहे. दरम्यान, काही ठिकाणी महावितरणच्या पथकाने कुठलीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत असून, आंदोलनात्मक पवित्रा घेण्याच्या तयारीप्रत शेतकरी पोहोचले आहेत.

..................

बॉक्स :

११ मार्चअखेर तोडलेला वीज पुरवठा (तालुकानिहाय)

वाशिम - ४१६

रिसोड - १२४२

मंगरूळपीर - ३६५

कारंजा - ९६७

मानोरा - १६३९

मालेगाव - ५८३३

...............................

कोट :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ मार्च रोजी विद्युत पुरवठा तोडण्यास स्थगिती दिली आणि काहीच दिवसांत ऊर्जामंत्र्यांनी स्थगिती उठवून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही हाती घेतली. कोरोनाच्या संकटामुळे आधीच जेरीस आलेल्या शेतकऱ्यांसमोर यामुळे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कारवाई न थांबविल्यास आंदोलन उभारण्यात येईल.

- राजू वानखेडे

संस्थापक, शेतकरी संघर्ष संघटना, वाशिम

...........

कोट :

महावितरणकडून अचानक सुरू झालेला विद्युतपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईने शेतकरी धास्तावले आहेत. भाजीपाला व फळपिकांचे यामुळे अतोनात नुकसान होणार आहे. धडक कारवाई करण्यापेक्षा काही दिवसांची मुदत देऊन तथा पूर्वसूचना देऊनच कारवाई सुरू व्हायला हवी होती. याप्रकरणी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल.

- विष्णुपंत भुतेकर

संस्थापक, भूमिपुत्र शेतकरी संघटना, वाशिम