शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत शक्ती प्रदर्शन

By admin | Updated: October 23, 2016 01:48 IST

नगरपालिका निवडणूक; राजकीय वातावरण तापले, नगराध्यक्ष उमेदवारांबाबत चुप्पी.

नंदकिशोर नारे वाशिम, दि. २२-जिल्हय़ात येत्या २७ नोव्हेंबर रोजी तीन नगर परिषदेची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. काँग्रेस, एमआयएम व सेनेच्यावतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती २१ व २२ ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या. यावेळी इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात जनसमुदाय असल्याचे दाखविण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले.भाजपाच्यावतीने उमेदवारांना अर्ज देण्यास सुरुवात करण्यात आली असून, अर्ज घेण्यासाठीसुद्धा उमेदवारांसोबत सर्मथक मोठय़ा प्रमाणात दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने २३ ऑक्टोबर रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखतीनंतर नगराध्यक्षपदाचा उमेदवार व महत्त्वाच्या वार्डातील उमेदवाराबाबत पक्षाने चुप्पी साधली आहे. जिल्हय़ातील तीन नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २४ नोव्हेंबरपासून प्रशासनाकडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे, तत्पूर्वी विविध राजकीय पक्षांच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी कार्यक्रम नियोजित करण्यात आले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी वाशिम येथील विठ्ठलवाडीमध्ये काँग्रेसच्या मुलाखती झाल्या. यावेळी नगराध्यक्षासह नगरसेवकाची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन केले. अनेक उमेदवारांनी तर चक्क जनतेची रॅली काढून विठ्ठलवाडी गाठल्याचे दिसून आले. त्याबरोबरच एमआयएम या पक्षाकडून तीनही नगरपालिकेत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, तेथेही उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन दिसून आले. शिवसेनेच्यावतिने २२ ऑक्टोबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जनशिक्षण संस्थान वाशिम येथे घेण्यात आल्या, येथेही मोठय़ा प्रमाणात सर्मथकांसह उमेदवारांची गर्दी होती. भाज पाच्यावतीने २४ ऑक्टोबर तर राष्ट्रवादी २३ ऑक्टोबर रोजी मुलाखती घेणार आहेत. भाजपातर्फे निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांसाठी अर्ज वितरण २२ ऑक्टोबरपासून २३ ऑक्टोबरपर्यंंत करण्यात येत आहे. आ. राजेंद्र पाटणी यांच्या कार्यालयात हाऊस फूल गर्दी दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षांचा स्वबळाचा निर्धारस्वबळावर निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे प्रत्येक वार्डात सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार दिसून येणार आहेत. प्रमुख राजकीय पक्ष आपण कोणाशीही युती करणार नसल्याचे म्हणत असल्याने सर्वच पक्षाचे स्वतंत्र उमेदवार निवडणुकीत राहणार आहेत. त्यामुळे पक्षाला निवडणूक लढविताना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याची राजकीय वतरुळात चर्चा आहे. निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे.