शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज सादर करताना ‘शक्ती प्रदर्शन’ येऊ शकते अंगलट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 19:15 IST

वाशिम : आदर्श आचारसंहितेच्या नियमावलीत नव्याने काही मुद्यांची भर पडून असून, आता उमेदवारी अर्ज सादर करताना तहसील कार्यालयावर शक्ती प्रदर्शन करणे, मिरवणूक नेणे संबंधित उमेदवारांच्या अंगलट येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेवारासोबत दोनपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग ठरणार आहे.

ठळक मुद्देशक्ती प्रदर्शन करणे, मिरवणूक नेणे संबंधित उमेदवारांच्या येणार अंगलटउमेवारासोबत दोनपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग ठरणार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आदर्श आचारसंहितेच्या नियमावलीत नव्याने काही मुद्यांची भर पडून असून, आता उमेदवारी अर्ज सादर करताना तहसील कार्यालयावर शक्ती प्रदर्शन करणे, मिरवणूक नेणे संबंधित उमेदवारांच्या अंगलट येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेवारासोबत दोनपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग ठरणार आहे.पाच वर्षाचा कार्यकाळ आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर रोजी घोषित केला आहे. वाशिम तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा तालुक्यातील ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ अशा एकूण २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज सादर करण्याला सुरूवात होणार आहे.निवडणुकीसोबतच आदर्श आचारसंहितादेखील लागू करण्यात आली. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. आता आदर्श आचारसंहितेच्या नियमावलीत काही मुद्यांची भर पडली आहे. त्यानुसार निवडणुक निर्णय अधिकारी यांचा कार्यालय परिसर प्रामुख्याने तहसिल कार्यालय व त्यांच्या संरक्षक भिंतीपासून १००  मिटरच्या परिसरात निवडणुका जाहीर झाल्यापासून मतमोजणीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात यावी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारासोबत ३ किंवा अधिक व्यक्ती असून नये, उमेदवारासोबत दोनपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास ही बाब आचारसंहितेचा भंग ठरू शकतो. त्यामुळे संबंधित उमेदवाराविरूद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले.आचार संहितेनुसार, ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रत्येक प्रभागासाठी उमेदवाराला एक प्रचार कार्यालय उघडण्याची परवानगी असेल. यासाठी आवश्यक तो विद्युत पुरवठा उपलब्ध करुन देण्याबाबत  महावितरणकडून उमेदवाराने रितसर परवानगी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. निवडणूक काळामध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाºया वाडे, वस्त्या या ठिकाणी मद्य  व अन्य पार्ट्या होत असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने या वाडे, वस्तीवर व रस्त्यावर स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने गस्त घालावी, आदी नव्या मुद्यांची भर टाकण्यात आली आहे. तहसिल क्षेत्रामधील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणीसाठी तहसिलदार व उपविभागीय अधिकाºयांकडे प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली आहे.