निनाद देशमुख /रिसोड: शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करणार्या शेतकर्यांना वीज वितरण कंपनीचा ह्यशॉकह्ण बसत आहे. रिसोड तालुक्यातील एकूण ११३0 शेतकर्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी रखडली असल्याची माहिती हाती आली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन अनेक शेतकरी शेतामध्ये नानाविध प्रकारचे प्रयोग करीत आहेत. कृषी विभागाकडून या प्रयोगाला प्रोत्साहन मिळत असले तरी वीज वितरण कंपनीकडून मात्र योग्य सहकार्य मिळत नसल्याचा प्रत्यय शेतकर्यांना येत आहे. रिसोड तालुक्यातील ११३0 शेतकर्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनी शाखा रिसोडकडे २0१२ ते एप्रिल २0१५ या दरम्यान अर्ज सादर केले जात आहे; मात्र या शेतकर्यांना अद्यापही वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकर्यांचे हिरवे स्वप्न करपून जात आहे. कृषी पंप वीज जोडणीचे काम औरंगाबादच्या एका खासगी कंपनीला देण्यात आल्याची माहिती रिसोड शाखेचे अभियंता सी.एम. पाठक यांनी दिली आहे.कोरडवाहू शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. या पृष्ठभूमीवर अनेक शेतकरी सिंचनाची सुविधा उपलब्ध करीत आहेत. रिसोड तालुक्यात विहिरीद्वारे सिंचन करणार्या शेतकर्यांची संख्या बर्यापैकी आहे. विहिरीवर कृषी पंप वीज जोडणी घेऊन शेती फुलविण्याचा प्रयत्न अनेक शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नातूनच २0१२ नंतर आतापर्यंंत ११३0 अर्ज कृषी पंप वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनी शाखा रिसोड या कार्यालयात प्राप्त झाले आहेत; मात्र या अर्जावर कुठलाही विचार नसल्याचे दिसून येत आहे. ३१ डिसेंबर २0१२ पर्यंतची कृषी पंप वीज जोडणीची कामे हाती घेण्यात आली आहे, असे अभियंता सी.एम. पाठक यांचे म्हणणे आहे. कृषी पंप वीज जोडणीच्या कामात एवढा विलंब कशासाठी असा, प्रश्न शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.
११३0 शेतक-यांची वीज जोडणी रखडली
By admin | Updated: May 18, 2015 01:36 IST