...................
३८ वीज रोहित्र नादुरुस्त
रिसाेड : तालुक्यातील ३८ पेक्षा अधिक विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. या वर्षी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नादुरुस्त राेहित्र दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
.................
करडईच्या क्षेत्रात माेठ्या प्रमाणात वाढ
अनसिंग : बाजारपेठेचा अभाव आणि वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे करडईच्या पेरणीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. तथापि, गेल्या काही वर्षांत या तेलवाणाला मागणी होत असल्याने शेतकऱ्यांचा पुन्हा या पिकाकडे कल वाढला आहे. यंदा सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ८० टक्के क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. गत पाच वर्षांतील हे प्रमाण सर्वाधिक आहे.
................
हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
शेलूबाजार : येथून जवळच असलेल्या आसेगाव येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानातून दरदिवशी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . याकडे ग्रामपंचायतसह पाणीपुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.