शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरात पोस्टमनचा ‘दुष्काळ’

By admin | Updated: June 5, 2014 00:58 IST

टपाल विभागाला तब्बल ३0 वर्षापासून पोस्टमॅनची भरती करण्याला मुहूर्त गवसला नाही.

वाशिम : पोस्ट कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्याचा डांगोरा पीटणार्‍या टपाल विभागाला तब्बल ३0 वर्षापासून पोस्टमॅनची भरती करण्याला मुहूर्त गवसला नाही. परिणामी टपाल विभागाचा कणा असलेल्या पोस्टमॅनची संख्या कमालीची रोडावली. वाशिम शहरही याला अपवाद नाही. शहरात आजमितीला केवळ सहाच पोस्टमॅन कार्यरत असल्याची धक्कादायक माहीती हाती आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून दळणवळणाच्या क्षेत्रात पोस्टाची मक्तेदारी राहिली आहे. काही वर्षापर्यंत पोस्टाच्या सेवेशिवाय सं पर्काचे साधन नव्हते. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निरोप, खुशाली, नोकरीविषयक पत्रे तसेच अन्य महत्वपूर्ण कागद पत्रासाठी पोस्टमनचीच वाट पाहावी लागत होती. परंतु गेल्या सा त-आठ वर्षात परिस्थिती बदलली आहे. स्पर्धात्मक युगामध्ये खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण व बाजारीकरणामुळे पोस्टाशिवाय अन्य माध्यमातूनही जनतेला विविध प्रकारच्या सेवासुविधा मिळू लागल्या आहेत. याचा विपरित परिणाम पोस्टावर होऊ लागला आहे. पोस्टाची होणारी अधोगती थांबविण्यासाठी टपाल विभागाने प्रोजेक्ट अँरो सारख्या विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. त्यातून पोस्ट कार्यालयांचे आधुनिकरण करण्यात आले आहे. परंतु आधुनिकरण करीत असताना टपाल विभागाचा कणा असलेल्या पोस्टमॅनची कडे या विभागाचे सपसेल दुर्लक्षच झाले आहे. दरम्यान शहरात आणखी तिन पोस्टमॅनचे पद वाढवून द्यावा असा प्रस्ताव स्थानिक डाक प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. तथापि, भरतीच बंद असल्याचे कारण समोर करून वरिष्ठानी सदर प्रस्ताव लालफितीत गुंडाळून ठेवला असल्याचेच दिसून येत आहे.