वाशिम : जिल्ह्यात ह्यनाफेडह्णच्या खरेदीचा तिढा कायमचं दिसून येत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. कधी मालाची आवक वाढल्याने, कधी माल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने तर आता बारदाण्याच्या अनुपलब्धतेमुळे शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीचा तिढा निर्माण झाला आहे. शेतमाल साठवून ठेवण्यासाठी बारदाना नसल्याने चार नाफेड खरेदी केंद्र बंद पडले असून, दोन ठिकाणी खरेदी सुरू असली तरी, ती संथगतीने असल्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांकडे कमी भावात तूर विकावी लागत आहे. जिल्ह्यातील वाशिम, अनसिंग, मालेगाव आणि कारंजा लाड या चार ठिकाणी नाफेडची खरेदी बारदाण्याअभावी बंद पडली आहे. जेथे सुरु आहे तेथे शेतमाल महिना महीना मोजल्या जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला साठवणुकीची अडचण असल्याने मोजणी रखडली आणि नाफेडची खरेहीही काही ठिकाणी बंद झाली. त्यानंतरमालाच्या वाहतुकीत येणारी घट शेतकऱ्यांकडून घेण्याच्या अटीवर खरेदी सुरू करून ही खरेदी सुरू केली. तथापि, या तडजोडीनंतरही शेतकऱ्यांच्या अडचणी कमी झाल्याच नाही. जवळपास सर्वच केंद्रात तुरीच्या मोजणीसाठी महिनाभराचा कालावधी लागत असताना. आता बारदाणा नसल्याने नाफेडची खरेदी बंद झाली आहे. यामुळे शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
नाफेड खरेदीचा तिढा कायमचं!
By admin | Updated: March 27, 2017 15:29 IST