शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

५३ ग्रामपंचायतींच्या धुरक-यांसाठी मतदान

By admin | Updated: August 31, 2015 01:19 IST

सरपंच-उपसरपंच निवडणूक; पार्डी ताड व मोठेगाव सरपंचपद रिक्त.

वाशिम : जिल्हय़ातील मंगरूळपीर, कारंजा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाची शेवटच्या टप्प्यातील निवडणूक ३0 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. मंगरुळपीर तालुक्यातील पार्डीताड व रिसोड तालुक्यातील मोठेगाव सरपंचपदासाठी कुणाचाही अर्ज न आल्याने दोन्ही ठिकाणी सरपंच पद रिक्त राहिले. मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील सरपंच पदाच्या आरक्षित जागेसाठी दावेदार नसल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. २६ ऑगस्टला १४ पैकी ११ गावात अविरोध तर ३ गावात सरपंच, उपसरपंच पदासाठी मतदान घेतले होते. उर्वरित ११ ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदासाठी ३0 ऑगस्टला मतदान घेण्यात आले. हिसई गावात सरपंच, उपसरपंच अविरोध झाले तर उर्वरित ठिकाणी मतदान घेण्यात आले. हिसई येथे सरपंचपदी कोकिळा सहदेव जाधव व उपसरपंच वंदना पंडित इंगोले यांची निवड झाली. तसेच पेडगाव येथे सरपंचपदी लता बाळू सुर्वे तर उपसरपंचपदी बाळू भिकाजी वैद्य यांच्या गळय़ात पडली. तर्‍हाळा येथे सरपंच लता मधुकर गावंडे व उपसरपंच वामन पांडुरंग चाबुकस्वार, पार्डी ताड येथे सरपंच पदासाठी आवश्यक आरक्षित जागा रिक्त राहल्याने तेथे केवळ उपसरपंच पदाकरिता निवडणुक घेण्यात आली यामध्ये उपसरपंच पदाची माळ ताईबाई मारोती गावंडे यांच्या गळय़ात पडली. येडशी येथे सरपंचपदी दयाराम अर्जुन चक्रनारायण व उपसरपंच शारदा गजानन सावंत, चोरद येथे सरपंच नाजूक नीळकंठ घुगे व उपसरपंच निर्मला उंकडा भोडणे, आदर्श ग्राम वनोजा येथे दिलीप शालीग्राम राऊत तर उपसरपंच प्रकाश किसन इंगोल, लावणा येथे खातुन बिराम परसुवाले सरपंच तर उपसरपंचपदी अशोक बाबुलाल गेडाम, मोहरी सरपंचपदी संजय केशवराव गावंडे तर उपसरपंचपदी संगीत पुडलीकराव इंगोले यांची निवड झाली आहे. निंबी ग्रामपंचायत सरपंचपद विशाखा ङ्म्रीकृष्ण मनवर व उपसरपंच नीता राजेश टोपले आणि फाळेगाव सरपंचपदी विद्या दिनेश व्यवहारे व उपसरपंचपदी ललिता प्रमोद मनवर यांची निवड झाली आहे.